Boxing Tournament : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची ३ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांची कमाई

245
Boxing Tournament : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची ३ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांची कमाई
Boxing Tournament : महाराष्ट्र मिलिटरी स्कूलची ३ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांची कमाई

गुरुपौर्णिमेनिमित्त ‘वीर सावरकर बॉक्सिंग क्लब’मध्ये झालेल्या डिव्हिजन लेव्हल बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र मिलिटरी स्कूलने ३ सुवर्ण आणि ६ रौप्य पदकांची कमाई करीत दमदार कामगिरी केली आहे.

दादर येथील ‘वीर सावरकर बॉक्सिंग क्लब’मध्ये २ जुलै रोजी ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाडच्या विद्यार्थ्यांनी दमदार खेळी करून पुन्हा एकदा विभागीय स्तरावरील स्पर्धांवर आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे. स्कुलचे बॉक्सिंग खेळाचे प्रशिक्षक संदेश गपाट यांनी अल्पावधीत या सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेतली.

महाराष्ट्र मिलिटरी स्कूल मुरबाडच्या संघाने मिळविलेल्या यशाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, कार्यवाह रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष सुरेश जाधव स्कूलचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच प्रशिक्षक राजेंद्र तिवारी आणि सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाकडून विजयी संघाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

पदक विजेते स्पर्धक

ओम गोळे – सुवर्ण पदक
सिद्धार्थ माळी – सुवर्ण पदक
मोनिश तेलंगे – सुवर्ण पदक
प्रवीण कपळ – रौप्य पदक
महेश गुप्ता – रौप्य पदक
कुणाल थोरवे – रौप्य पदक
मीत गुरव – रौप्य पदक
यश गायकवाड – रौप्य पदक
आर्यन भालेराव – रौप्य पदक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.