खलिस्तानींनी लावली अमेरिकेतील भारतीय दूतावासाला आग

211
खलिस्तानींनी लावली अमेरिकेतील भारतीय दूतावासाला आग

नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा झाला. एकीकडे या दौऱ्यामधून भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्रीचे संबंध अधिक दृढ झाले तर दुसरीकडे अमेरिकेतल्या भारतीय दूतावास पेटवून देण्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खलिस्तान समर्थकांनी रविवारी (२ जुलै) सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावास पेटवण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक माध्यमांनी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर सॅन फ्रान्सिस्को फायर डिपार्टमेंटने वेळीच कारवाई करत ही आग विझवली होती. सुदैवाने या आगीत कोणतेही नुकसान झाले नाही.

एका वृत्तवाहिनीने या घटनेचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. त्या व्हिडीओमधून रविवारी पहाटे हा सर्व प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडिओ खलिस्तान समर्थकांनी शेअर केल्याचं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती इमारतीला आग लावताना दिसत आहे. खलिस्तानी नेत्यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं यामधून दिसून येत आहे.

(हेही वाचा – MHADA : म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्याकरता उरले शेवटचे सात दिवस)

यानंतर अमेरिका सरकारचे प्रतिनिधी मॅथ्यू मिलर यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. “सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासावर झालेल्या कथित हल्ल्याचा अमेरिका जाहीर निषेध करते. विदेशी संपत्तीचे नुकसान करणे किंवा विदेशी अधिकाऱ्यांवर हल्ला करणे या दोन्ही गोष्टी अमेरिकेत फौजदारी गुन्हा आहे.” अशा आशयाचं ट्विट मॅथ्यू यांनी केलं आहे.

सिख फॉर जस्टिस (SFJ) या प्रमुख दहशतवादी संघटनेच्या गुरपतवंत सिंग पन्नूने ३० जून रोजी सांगितले होते की, ८ जुलैपासून भारतीय दूतावासांना घेराव घालण्यात येईल. ही घटना जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ जुलैच्या रात्री भारतीय दूतावासाला आग लागली. ही घटना जरी शनिवारी घडली असली तरीही अमेरिकी सरकारचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी मंगळवारी याबाबत संपूर्ण जगाला माहिती देत या घटनेचा विरोध केला. सध्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) कडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

पाच महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अमृतपालच्या सुटकेची मागणी करत खलिस्तान समर्थकांनी मार्चमध्ये या दूतावासाला घेराव घातला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.