Lucknow Fire News: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील अलीगंज परिसरात सोमवारी दुपारी एका तीन मजली इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बहुतेक विद्यार्थी आहेत. ६ जण जखमी आहेत.
दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या कोचिंगमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेतले होते. एका मुलाने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव वाचवला. पण तो खाली ग्रीलवर पडला आणि गंभीर जखमी झाला.
हेही वाचा – Dombivli MIDC च्या निवासी विभागाची लोडशेडिंगमधून लवकरच मुक्तता; रहिवाशांच्या एकजुटीला यश
अग्निशमन दलाच्या सुमारे १० गाड्या घटनास्थळी आहेत. एक हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आग विझवण्याचे काम करत आहे. एसडीआरएफ (SDRF) आणि एनडीआरएफ (NDRF) देखील पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीची मागची भिंत तोडली आहे, ज्यातून मृतदेह बाहेर काढले जात आहेत.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अजूनही सुमारे १० लोक आत अडकले आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक घटनास्थळी पोहोचले आहेत. सुमारे १४ रुग्णवाहिका मागवण्यात आल्या आहेत.
हेही पहा –


