Dombivli MIDC च्या निवासी विभागाची लोडशेडिंगमधून लवकरच मुक्तता; रहिवाशांच्या एकजुटीला यश

संतप्त रहिवाशांसह राजसैनिकांच्या धडक मोर्चानंतर महावितरणकडून नवीन केबल आणि डीपी बसविण्याचे आश्वासन

73
Residents of Dombivli MIDC meeting with officials for power issues.
Dombivli MIDC च्या निवासी विभागाची लोडशेडिंगमधून लवकरच मुक्तता; रहिवाशांच्या एकजुटीला यश
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli MIDC                 डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील आर एच १८ ते आर एच २४ सोसायटी रांगेतील रहिवाशांच्या एकजुटीला यश आले आहे. मनसेसह रहिवाशांनी सोमवारी काढलेल्या धडक मोर्चानंतर महावितरणचे मुख्य अभियंता गिरीश भगत यांच्याकडून नवीन केबल व डीपी बसविण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे एमआयडीसीच्या निवासी विभागाची लोडशेडिंगच्या त्रासातून लवकरच मुक्तता होण्याची चिन्हे आहेत. (Dombivli MIDC)

(हेही वाचा – Ram Mandir, Ayodhya: निधी घोटाळा, चोरी प्रकरणाबाबत द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य नाराज, तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले…)

रविवारी अचानक इलेक्ट्रिक केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे तब्बल २४ तास वीजपुरवठा खंडित होता. कडक उन्हाळ्यात आणि उकाड्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत सोमवारी मनसेचे विभागाध्यक्ष संजय चव्हाण, विभाग सचिव अजय घोरपडे, शाखाध्यक्ष योगेश माने, उपशाखाध्यक्ष शाम फिसके, शाखाध्यक्षा ज्योती पाटील, वत्सला मांढरे, उपशाखाध्यक्षा ज्योती मांढरे, यांच्यासह राजसैनिक आणि स्थानिक रहिवाशांनी महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी मनसेचे विभागाध्यक्ष संजय चव्हाण यांनी निवेदनाद्वारे महावितरणचे मुख्य अभियंता गिरीश भगत यांचे लक्ष वेधले. अभियंता भगत यांची भेट घेऊन रहिवाशांनी त्यांना वीज पुरवठा खंडित होण्याचा तीव्र त्रास समजावून सांगितला. भविष्यात असा त्रास होऊ नये यासाठी नवीन केबल टाकणे आणि नवीन डीपी बसविण्याबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. राजसैनिक आणि रहिवाशांच्या आक्रमक पण संयमी पवित्र्यामुळे महावितरणचे मुख्य अभियंता गिरीश भगत यांनी तातडीने दखल घेतली. सोमवारपासूनच नवीन केबल आणि डीपी बसविण्याच्या कामाला सुरूवात करण्यात येईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. (Dombivli MIDC)

(हेही वाचा – स्वच्छ व हरित Dombivli साठी सव्वा लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट; ५० सामाजिक संस्थांचा कृती आराखडा)

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वारंवार बत्ती गुल होण्याचे प्रमाण वाढले होते. जुनी केबल आणि ओव्हरलोड झालेल्या डीपीमुळे वारंवार बिघाड होत असे. रहिवाशांच्या मागणीनुसार आता नवीन केबल टाकून नवीन क्षमतेचा डीपी बसवल्याने लोडशेडिंगचा त्रास कायमचा कमी होणार असल्याचे मनसेचे विभागाध्यक्ष संजय चव्हाण यांनी सांगितले. महावितरणने काम सुरू केल्याची माहिती दिल्यानंतर रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. एकजुटीने आवाज उठवला तर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोच, शिवाय प्रशासनाकडून समस्यांचा निपटारा तातडीने करण्यात येत असल्याचा विश्वास उपस्थित रहिवाशांनी व्यक्त केला. (Dombivli MIDC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.