स्वच्छ व हरित Dombivli साठी सव्वा लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट; ५० सामाजिक संस्थांचा कृती आराखडा

85
डोंबिवलीतील वृक्षारोपण बैठकीत नागरिकांची उपस्थिती.
स्वच्छ व हरित Dombivli साठी सव्वा लाख वृक्षारोपणाचे उद्दिष्ट; ५० सामाजिक संस्थांचा कृती आराखडा
  • कल्याण, प्रतिनिधी

Dombivli                 डोंबिवली स्वच्छ आणि हिरवीगार करण्यासाठी शहरातील सुमारे ५० सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन नागरी अभिवादन न्यास या शिखर संस्थेच्या माध्यमातून मोठा निर्धार केला आहे. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा कृती आराखडा तयार करण्यासाठी आयोजित बैठकीत इंदूर शहराचा आदर्श ठेवून डोंबिवली स्वच्छ करू, असा सामूहिक संकल्प करण्यात आला. रविवारी सायंकाळी आयोजित केलेल्या या बैठकीत ७५ हून अधिक नागरिकांसह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर राहूल दामले, आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त रामदास कोकरे, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, नगरसेविका खुशबू चौधरी, पद्मश्री गजानन माने यांच्यासह अनेक पर्यावरण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Dombivli)

केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांनी १ एप्रिल पासून पर्यावरण कायद्याखाली अमलात आलेल्या नवीन नियमांची माहिती दिली. या नियमांत कचरा वर्गीकरण न करणाऱ्यांवर दंडाची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार घनकचरा कसा वर्गीकृत करावा याचे प्रात्यक्षिक मार्गदर्शनही त्यांनी केले. उपमहापौर राहूल दामले यांनी नागरिकांनी कचऱ्याबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. ताबडतोब वृक्षारोपण का महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी महापालिका कशी मदत करेल हे त्यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेने या वर्षात सव्वा लाख झाडे लावणे आणि जगविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. झाडे लावण्यासाठी महानगरपालिका रोपे आणि तांत्रिक मार्गदर्शन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Dombivli)

(हेही वाचा – Strait of Hormuz : होर्मूझ सामुद्रधुनीत पुन्हा खळबळ, इराणच्या घोषणेनंतर जहाज वाहतूक मंदावली)

कृती आराखड्याचे ठळक मुद्दे

केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल यांनी चर्चेऐवजी थेट कृतीवर भर देत शहरात रोज निर्माण होणाऱ्या ७० टन कचऱ्याचे वर्गीकरण आणि त्यात कपात कशी करायची याची रूपरेषा मांडली. कचरा वर्गीकरण आणि घट करण्यासाठी कोणत्या विभागातील सोसायट्या, चाळी आणि वस्त्यांमध्ये जनजागृतीची गरज आहे ते निश्चित करून, त्या विभागात काम करणाऱ्या संस्थांची यादी तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. (Dombivli)

नागरी अभिवादन न्यासाचा पुढाकार

बैठकीचे संपूर्ण सूत्रसंचालन न्यासाचे सचिव प्रवीण दुधे यांनी केले. त्यांनी स्वयंस्फूर्तीने पर्यावरण संवर्धन करणाऱ्या संस्थांची माहिती देऊन उपस्थितांमध्ये आपणही काही केले पाहिजे, ही उर्मी निर्माण केली. उपाध्यक्ष माधव जोशी यांनी समारोप करताना गेल्या काही वर्षात शहराच्या स्वच्छतेत झालेली सुधारणा अधोरेखित केली. आज आपण हे केले नाही तर आपल्या मुलांचे-नातवंडांचे भविष्य काळेकुट्ट होईल, असा इशारा देत बनू इंदूर हा सामूहिक निर्धार व्यक्त केला. अनेक संस्थांनी जनजागृती आणि वृक्षारोपणासाठी विभाग मागून घेतले. (Dombivli)

(हेही वाचा – Pedestrian Deaths: राष्ट्रीय महामार्गांवरच सर्वाधिक पादचारी मृत्यू, ६ वर्षांत १.८ लाखांहून जास्त जणांचा बळी)

सहभागाचे आवाहन

या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था किंवा नागरिकांनी गणेश मंदिरात प्रवीण दुधे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. आयुक्त, उपमहापौर आणि उपायुक्त यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून आढावा घेण्यासाठी अशा बैठका वारंवार घेण्याचे कबूल केले. (Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.