Ganeshotsav 2026 : ‘महाराष्ट्र सदना’तील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; मोदकांनी जिंकली सर्वांची मने

13
Ganeshotsav 2026 : 'महाराष्ट्र सदना'तील गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला; मोदकांनी जिंकली सर्वांची मने

Ganeshotsav 2026           नवी दिल्ली येथील ‘महाराष्ट्र सदन’मध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या आराधनेसोबतच येथे महाराष्ट्राची समृद्ध खाद्यसंस्कृती आणि परंपराही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांच्या स्पर्धेत महिलांनी अनेकविध पदार्थ स्वतः तयार केले होते. या स्पर्धेत गणेश चतुर्थीला महाराष्ट्रातील घरोघरी विशेषत्वाने बनवला जाणारा ‘मोदक’ हा आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला. ‘महाराष्ट्र सदन’मध्ये आयोजित केलेल्या या पारंपरिक खाद्यपदार्थ स्पर्धेत महिलांनी आपल्या कौशल्याचा वापर करून पौष्टिक, स्वादिष्ट आणि रुचकर स्वाद आणला. (Ganeshotsav 2026)

(हेही वाचा – Iran-US Conflict : इराणच्या सर्व एअरलाइन्स बुधवारपासून बंद केल्या जातील; अमेरिकेचे अर्थसचिव स्कॉट बेसेंट यांचा दावा)

गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धेत महिलांनी केवळ आपल्या हाताची चव दाखवली नाही, तर पिढ्यानपिढ्या घराघरांत जपली गेलेली महाराष्ट्राची पाककला परंपराही समोर आणली. मुख्य अतिथींनीही महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक पदार्थांची पाहणी करून त्यांच्या कौशल्याचे कौतुक केले. गणपती बाप्पाच्या नैवेद्यापासून ते महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरापर्यंत… अनेकविध पदार्थ तसेच कोकणापासून ते विदर्भापर्यंत, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत मोदक बनवण्याची स्वतःची वेगळी परंपरा आहे. कुठे उकडीचे मोदक, तर कुठे वेगवेगळ्या स्वादाचे आणि वेगवेगळ्या सारणाचे मोदक तयार केले जातात. म्हणजेच मोदक एकच… पण त्याशी जोडलेल्या महाराष्ट्राच्या विविध खाद्यपरंपरांचा मागोवा यावेळी घेण्यात आला. विशेषत: मोदक ही केवळ एक मिठाई नसून श्रद्धा, परंपरा आणि कौटुंबिक वारसा आहे, ही जाणीव यावेळी प्रकर्षाने अनेकांना झाली. (Ganeshotsav 2026)

(हेही वाचा – युईएफए नेशन्स लीगपूर्वी Cristiano Ronaldo पोर्तुगालच्या संघात सामील)

या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या धर्मपत्नी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांनी तयार केलेल्या पदार्थांची पाहणी केली आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक पाककलेची माहिती घेतली. विशेष बाब म्हणजे, विविध महिलांनी बनवलेल्या पदार्थांमधून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशांची झलक दिसून आली. (Ganeshotsav 2026)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.