Kurla : अनधिकृत फेरीवाल्यामुळे झालेल्या वादातून भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण; हिंदू संघटना आक्रमक

84
Kurla : अनधिकृत फेरीवाल्यामुळे झालेल्या वादातून भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण; हिंदू संघटना आक्रमक
  • प्रतिनिधी 

महानगरपालिकेच्या निवडणुका संपताच कुर्ला परिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि बेकायदेशीर रिक्षाचालकांचा मुजोरीपणा समोर आला आहे. कुर्ला पश्चिम येथील फेरीवाल्याकडून क्षुल्लक कारणावरून भाजपाचे कार्यकर्ते असलेल्या पितापुत्रासह चौघांना भररस्त्यात मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमुळे कुर्ल्यात तणावाचे वातावरण पसरले असून हिंदू संघटनांनी फेरीवाले आणि बेकायदेशीर रिक्षाचालकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी ६ ते ७ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. (Kurla)

(हेही वाचा – Mantralaya : सहाव्या मजल्यावर शोभिवंत कुंड्या; नागरिकांची गैरसोय होणार)

आकाश सिंह, असीम सिंग, कोसलेंद्र प्रताप सिंग आणि आदित्य पानसे असे मारहाणीत जखमी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी कुर्ला पश्चिम न्यु मिल रोड येथे असलेल्या सुर्वे टिम्बर मार्ट येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांनी रस्ता अडवल्यामुळे वाहतूककोंडी निर्माण झाली होती. त्यावेळी भाजपाचे कार्यकर्ते आकाश सिंह असीम आणि कोसलेंद्र सिंह हे तेथून जात असताना भारत नगर वांद्रे पूर्व येथील दोघांनी आपली मोटार सायकल मध्येच उभी केल्याने संपूर्ण रस्त्यावर वाहतूककोंडी झाली, दरम्यान आकाश सिंह यांनी मोटरसायकल स्वाराला मोटारसायकल काढण्यास सांगितले असता मोटारसायकलस्वार आणि त्याच्या सहकाऱ्याने आकाश सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली, या दोघांनी आपल्या काही सहकाऱ्यांना त्याठिकाणी बोलावून घेतले सहा ते सात जणांनी आकाश सिंह, असीम सिंह, कोसलेंद्र प्रताप सिंग आणि आदित्य पानसे यांना चामडी पट्याने, पेव्हरब्लॉकने मारहाण करण्यास सुरुवात केली. (Kurla)

(हेही वाचा – Union Budget 2026 : सरकारच्या तिजोरीत पैसा कुठून येतो?, जाणून घ्या)

या मारहाणीत चौघे जखमी झाले असून आकाश सिंह यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, या घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली, दरम्यान मारेकरी तेथून फरार झाले होते. या मारहाणीचा व्हिडिओ समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. हा व्हिडिओ व्हायरल होताच कुर्ल्यातील हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर गोळा झाले. आरोपींना अटक करून फेरीवाले, बेकायदेशीर रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी केली. मारेकरी हे देखील कुर्ल्यात फेरीचा व्यवसाय करत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान कुर्ला पोलिसांनी या मारहाणी प्रकरणी सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ (हत्येचा प्रयत्न) ११८(२) (मारहाण करणे) सह अनेक कलम लावण्यात आले असून एकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होताच कुर्ल्यात सोमवारी तणाव निर्माण झाला होता. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. (Kurla)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.