KDMC Politics : महापौरपदाचा पेच कायम; संख्याबळाच्या दाव्यावरून महायुतीमध्ये रस्सीखेच

59
कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूचे दोन्ही रूग्ण धोक्याबाहेर; KDMC कडून दक्षतेचे आवाहन
कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूचे दोन्ही रूग्ण धोक्याबाहेर; KDMC कडून दक्षतेचे आवाहन
  • कल्याण, प्रतिनिधी

महायुतीकडे १०३ जागांचे संख्याबळ असले तरी दोन्ही अर्थात भाजपा आणि शिवसेनेने महापौरपदावर दावा केला आहे. संख्याबळ जास्त असल्याने आपलाच महापौर व्हावा, यासाठी शिवसेना आग्रही आहे. तर भाजपाने आपल्या वाढलेल्या ताकदीचा हवाला दिला आहे. अशा परिस्थितीत मनसेची भूमिका आणि नॉट रिचेबल असलेल्या नगरसेवकांचा पाठिंबा कुणाला मिळतो, यावर पुढील समीकरणे अवलंबून राहणार आहेत. संख्याबळाच्या दाव्यानुसार महायुतीच्या दोन्ही पक्षांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. (KDMC Politics)

(हेही वाचा – Republic Day 2026 : परेड पाहण्यासाठी सुमारे १० हजार विशेष पाहुणे, कुणा-कुणाला आमंत्रण?)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता महापौरपदासाठी राजकीय खलबतांना वेग आला आहे. बहुमत मिळवूनही भाजपा आणि शिवसेना यांच्यात महापौरपदावरून रस्सीखेच सुरू असतानाच, मनसे आणि इतर पक्षांचे नगरसेवक गायब झाल्याने वेगवेगळ्या चर्चांणा उधाण आले आहे. महापौरपदासाठी फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा असताना मनसेच्या ५ नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहेत. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक देखिल नॉट रिचेबल झाल्याने महायुतीपुढे नवा पेच उभा राहिला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या भाजपाला ५० आणि शिवसेनेला ५३ असे स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर महापौर कुणाचा बसवायचा ? यावरून पेच निर्माण झाला आहे. त्यातच मनसे आणि इतर पक्षांचे नगरसेवक नॉट रिचेबल झाल्याने पेच आणखी वाढला आहे. (KDMC Politics)

(हेही वाचा – Mantralaya : सहाव्या मजल्यावर शोभिवंत कुंड्या; नागरिकांची गैरसोय होणार)

मनसेचे ५ आणि शिवसेना उबाठाच्या चिन्हावर निवडणूक लढवूनही प्रत्यक्षात मनसेचे असलेल्या २ अशा एकूण ७ नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आले आहे. त्यातच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी किंवा महापौरपदाच्या निवडणुकीत स्वतःचे वजन वाढविण्याकरिता मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीची भूमिका समजू शकत नाही. महाविकास आघाडीशी संबंधित दोन नगरसेवक सध्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. (KDMC Politics)

(हेही वाचा – Union Budget 2026 : सरकारच्या तिजोरीत पैसा कुठून येतो?, जाणून घ्या)

केडीएमसीत पक्षीय बलाबल (एकूण १२२ जागा) : 

  • शिवसेना  : ५३
  • भाजपा : ५०
  • शिवसेना उबाठा : ११
  • मनसे : ५
  • काँग्रेस : २
  • राष्ट्रवादी (शप) : १

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.