Padgha NIA Raid : ‘मजलीश’मध्ये पॅलेस्टाईन, इस्लाम धोक्यात या विषयावर होत होती चर्चा

साकिब हा पडघ्यात नियमित मजलीश घेत आयोजित करीत होता, व दुसऱ्या धर्माबाबत मुस्लिम तरुणाची माथी भडकावत होता.

178
Padgha NIA Raid : 'मजलीश'मध्ये पॅलेस्टाईन, इस्लाम धोक्यात या विषयावर होत होती चर्चा
Padgha NIA Raid : 'मजलीश'मध्ये पॅलेस्टाईन, इस्लाम धोक्यात या विषयावर होत होती चर्चा

एनआयए पडघा-बोरिवली येथून अटक करण्यात आलेल्या पैकी इसिसचा महाराष्ट्रातील नेता साकिब नाचन हा नियमित ‘मजलीश’ आयोजित करीत होता. ‘मजलीश’मध्ये पॅलेस्टाईन समस्या, भारतातील मुस्लिमांची सद्यस्थिती आणि इस्लामला कथित धोका या विविध विषयांवर चर्चा केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Padgha NIA Raid)

‘मुस्लिम’ समाजामध्ये मजलीशला खूप महत्व दिले जाते. नमाज पठण झाल्यानंतर मशिदीत धर्मगुरू कुराण शरीफ बाबत चांगली धार्मिक माहिती देतात. त्यात ही दोन प्रकारचे लोक असतात एक तर चांगली धार्मिक माहिती देणारा तर दुसरे कट्टरपंथी हे धर्माच्या नावाखाली लोकांची माथी भडकावणारी माहिती देणारे, त्यापैकी पडघा-बोरिवली येथुन अटक करण्यात आलेला साकिब नाचन हा एक आहे. (Padgha NIA Raid)

(हेही वाचा – LTT Station Fire: मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये भीषण आग)

मजलीशद्वारे मुस्लिम तरुणाची माथी भडकावत होता साकिब

साकिब हा पडघ्यात नियमित मजलीश घेत आयोजित करीत होता, व दुसऱ्या धर्माबाबत मुस्लिम तरुणाची माथी भडकावत होता. साकिब नाचन हा आयोजित करीत असलेल्या मजलीशमध्ये पॅलेस्टाईन समस्या, भारतातील मुस्लिमांची सद्यस्थिती आणि इस्लामला कथित धोका या विविध विषयांवर चर्चा केली जात होती अशी माहिती समोर येत आहे. साकिब हा केवळ पडघा नाहीतर इतर जिल्हयातील मुस्लिम बहुल इलाक्यात मजलीशचे आयोजन करून माथी भडकावण्याचे काम करीत होता. (Padgha NIA Raid)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.