Lok Sabha Security Breach : ज्यांच्या पासवर आलेल्या युवकांनी संसदेत गदारोळ केला, ते म्हैसूरचे खासदार प्रताप सिंहा कोण आहेत ?

Lok Sabha Security Breach : बुधवार, १३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या कामकाजादरम्यान 2 युवकांनी सुरक्षा धोक्यात घालून गोंधळ निर्माण केला. ते युवक म्हैसूरचे खासदार प्रताप सिंहा (MP Pratap Simha) यांच्या पासवर संसदेत पोहोचले होते.

309
Lok Sabha Security Breach : ज्यांच्या पासवर आलेल्या युवकांनी संसदेत गदारोळ केला, ते म्हैसूरचे खासदार प्रताप सिंहा कोण आहेत ?
Lok Sabha Security Breach : ज्यांच्या पासवर आलेल्या युवकांनी संसदेत गदारोळ केला, ते म्हैसूरचे खासदार प्रताप सिंहा कोण आहेत ?

बुधवार, १३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या कामकाजादरम्यान 2 युवकांनी सुरक्षा धोक्यात घालून गोंधळ निर्माण केला. ते युवक म्हैसूरचे खासदार प्रताप सिंहा (MP Pratap Simha) यांच्या पासवर संसदेत पोहोचले होते. (Lok Sabha Security Breach)

(हेही वाचा – ISIS कडून ‘शरबत सफर’ या सांकेतिक शब्दाचा यासाठी केला जायचा वापर)

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Sessions of Parliament) हा आठवा दिवस होता. या वेळी संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्यात आला आहे. संसदेच्या सुरक्षेच्या दाव्याला छेद देण्यासाठी दोन तरुणांनी लोकसभेच्या अभ्यागतांच्या दालनातून खाली उडी मारली. दरम्यान, दोन्ही आरोपींनी भाजप (BJP) खासदार प्रताप सिंहाच्या (MP Pratap Simha) संदर्भाने बनवलेल्या व्हिजिटर्स पासद्वारे संसदेत प्रवेश केल्याचे वृत्त आहे.

म्हैसूरचे खासदार प्रताप सिंहा

42 वर्षीय प्रताप सिंहा हे म्हैसूर (Mysore, Karnataka) येथून भाजपचे खासदार आहेत त्यांच्या वडिलांचे नाव स्वर्गीय बी. ई. गोपाल गौडा आहे. ते कन्नड भाषेतील वर्तमानपत्रांमध्ये स्तंभ लिहितात. ते व्यवसायाने पत्रकार आहेत. ते त्यांच्या हिंदुत्ववादी राजकारणासाठी ओळखले जातात. ते कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष आहेत. (Lok Sabha Security Breach)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.