ISIS कडून ‘शरबत सफर’ या सांकेतिक शब्दाचा यासाठी केला जायचा वापर

एक्सेल शीटनुसार, ४,६०० रुपये "शरबत सफर" साठी वाटप करण्यात आले असे नमूद करण्यात आले.

150
ISIS कडून 'शरबत सफर' या सांकेतिक शब्दाचा यासाठी केला जायचा वापर
ISIS कडून 'शरबत सफर' या सांकेतिक शब्दाचा यासाठी केला जायचा वापर

इसिसच्या परदेशातील हँडलर्सकडून आलेला निधीचा वापर स्फोटकाचा कच्चा माल आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी करण्यात येत होता, व त्यासाठी ‘शरबत सफर’ (Sharbat Safar) या सांकेतिक शब्द (कोडवर्ड) वापरण्यात येत होते अशी धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. (ISIS)

पडघा-बोरिवलीसह ४४ ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शनिवारी पहाटे छापे टाकून इसिस या दहशतवादी संघटनेचा महाराष्ट्र मॉड्युलचा नेता साकीब नाचनसह (Saqib Nachan) १५ जणांना अटक करण्यात आली. या छापेमारी दरम्यान एनआयएने (NIA) अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या घरातून तसेच कार्यालयातून मोठ्या रकमेसह कागदपत्रे, शस्त्र, डिजिटल साहित्य, डिव्हाईस मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले होते. (ISIS)

(हेही वाचा – Lok Sabha Security Breach : लोकसभेत उपस्थित खासदारांनी सांगितला धक्कादायक प्रकार)

जप्त करण्यात आलेल्या संगणक, हार्डडिक्समध्ये एनआयए मोठ्या प्रमाणात एक्सेल सीटमध्ये हिशोबाच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत. सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान येथील इसिसच्या (ISIS) हँडलर्सकडून पाठविण्यात येणाऱ्या निधीचा हिशोब मांडण्यात आला आहे. निधी कुठल्या कामासाठी खर्च करण्यात आला याबाबत माहिती देण्यात आली आहे, मात्र ही माहिती देताना सांकेतिक शब्दाचा (कोडवर्ड)चा वापर करण्यात आला आहे. (ISIS)

एक्सेल शीटनुसार, ४,६०० रुपये ‘शरबत सफर’ (Sharbat Safar) साठी वाटप करण्यात आले असे नमूद करण्यात आले. ‘शरबत सफर’ (Sharbat Safar) या सांकेतिक शब्दाचा अर्थ स्फोटक सामुग्री बॉम्ब इत्यादी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदी करण्यासाठी वाटप करण्यात आला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार या प्रकारचे अनेक सांकेतिक शब्द इतर गोष्टींसाठी वापरले गेले असावे याचा तपास सुरू आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार पडघा शेजारी आलेल्या डोंगराळ भागात असलेल्या दाट झुडुपांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणावर या निधींपैकी मोठी रक्कम खर्च करण्यात आली आहे. (ISIS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.