Solapur Drugs Factory Case : सोलापूर ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी हैद्राबादमधून केमिकल इंजिनियरला अटक, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

कैलासन हा ड्रग्सच्या धंद्यात डॉक्टर म्हणून ओळखला जातो, एमडी आणि इतर अमली पदार्थाचा फार्म्युला देण्याचे काम कैलासन उर्फ डॉक्टर हा करीत होता.

120
Solapur Drugs Factory Case : सोलापूर ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी हैद्राबादमधून केमिकल इंजिनियरला अटक, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
Solapur Drugs Factory Case : सोलापूर ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणी हैद्राबादमधून केमिकल इंजिनियरला अटक, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई

मुंबई गुन्हे शाखेने दोन आठवड्यापूर्वी सोलापूर येथून एका फॅक्टरीमधून जप्त करण्यात आलेल्या ११६ कोटी एमडी या अमली पदार्थ प्रकरणात हैद्राबाद येथून एका केमिकल इंजिनियरला अटक करण्यात आली आहे. कैलासन वनमाली (५८) असे अटक करण्यात आलेल्या केमिकल इंजिनीयरचे नाव आहे. कैलासन हा ड्रग्जच्या धंद्यात डॉक्टर म्हणून ओळखला जातो, एमडी आणि इतर अमली पदार्थांचा फार्म्युला देण्याचे काम कैलासन उर्फ डॉक्टर हा करीत होता. या गुन्ह्यात आणखी आरोपी असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. (Solapur Drugs Factory Case)

मुंबई गुन्हे शाखा कक्ष ९ च्या पथकाने दोन आठवड्यापूर्वी खार परिसरातून १० कोटीच्या एमडीसह दोन जणांना अटक केली होती. या दोघांच्या चौकशीतून सोलापूर जिल्ह्यातील एका गावात एमडीची फॅक्टरी असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा कक्ष ९ चे प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक आणि पथकाने १५ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली एमआयडीसी परिसरात एका फॅक्टरीवर छापा टाकून १०० कोटींचा एमडी तयार करण्यात येणार कच्चा माल जप्त करण्यात आला होता. पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रपोनि. दया नायक आणि पथकाने सोलापूर येथे केलेल्या कारवाई नंतर पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली होती. (Solapur Drugs Factory Case)

(हेही वाचा – Mumbai University : महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थांना मनस्ताप; मुंबई विद्यापीठ करणार कारवाई)

सोलापूर येथे तयार करण्यात येणार एमडीचा फार्म्युला एका केमिकल इंजियरने दिला होता, व त्याने या प्रकारे अनेकांना हे फार्म्युले दिले असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या केमिकल इंजिनियरचा माग घेतला असता केमिकल इंजिनियर उर्फ डॉक्टर कैलासन वनमाली हा हैद्राबाद येथील असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने हैद्राबाद येथून कैलासन याला ताब्यात घेऊन मुंबईत आणून त्याला अटक करण्यात आली. कैलासन हा मुख्य आरोपी पैकी एक असून या प्रकरणात ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट असून तसेच फॅक्टरी चालवणारा दळवी नावाचा व्यक्ती आहे. या सर्वच कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे. गुन्हे शाखेने अटक केलेल्या केमिकल इंजिनियर कैलासन वनमाली याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष ९ चे प्रभारी पोलिसांनी निरीक्षक दया नायक यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. (Solapur Drugs Factory Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.