UBT Shiv Sena : उबाठा शिवसेना सोशल मिडिया सेलकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री होतात ट्रोल

मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावा पार पडले असून या आझाद मैदानात पार पडलेल्या शिवसेना मेळाव्याची सभा आणि मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर उबाठा शिवसेनेकडून ट्रोल केला जात आहे.

24
UBT Shiv Sena : उबाठा शिवसेना सोशल मिडिया सेलकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री होतात ट्रोल
UBT Shiv Sena : उबाठा शिवसेना सोशल मिडिया सेलकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री होतात ट्रोल

मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावा पार पडले असून या आझाद मैदानात पार पडलेल्या शिवसेना मेळाव्याची सभा आणि मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावर उबाठा शिवसेनेकडून ट्रोल केला जात आहे. या सभेवरून उबाठा शिवसेनेकडून सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. दोन्ही शिवसेनेकडून एकमेकांना ट्रोल केले जात असले तरी या ट्रोलिंगमध्ये शिवसेना उबाठा गटाचे सोशल मिडिया सेल आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. (UBT Shiv Sena)

उबाठा शिवसेनेचा शिवतिर्थावरील दसरा मेळावा हा मर्दांचा मेळावा असल्याचे जाहीर करत हा मेळावा घेतला असला तरी शिवसेनेने आपला दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससमोरील आझाद मैदानात झाला. यावरून सोशल मिडियावर उबाठा शिवसेनेच्या सोशल मिडिया सेलकडून शिवसेनेच्या सभांचा आणि त्यातील मुख्यमंत्र्यांचे भाषण ट्रोल केले जात आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दसरा मेळाव्याला संबोधित करण्यास जाण्यापूर्वी त्यांनी क्रॉस मैदानातील रावण दहनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी मारलेला धनुष्याचा बाण हा रावणाला न लागता खाली पडला आणि त्यानंतर त्यांनी दुसरा बाण मारला. यावरून शिवसेनेच्या सोशल मिडिया ग्रुपवरून ट्रोल केले जात आहे. (UBT Shiv Sena)

याबरोबरच शिवतिर्थावर उध्दव ठाकरे यांचे भाषण प्रथम सुरु झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु झाले. पण एबीपी माझा, टिव्ही नाईनसह काही वृत्तवाहिन्यांनी मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केल्यांनतरही त्यांचे भाषण लाईव्ह करण्याऐवजी उध्दव ठाकरेंचे भाषण लाईव्ह ठेवले. त्यातच या दोघांचे भाषण युट्युबवर पाहणाऱ्यांमध्ये उध्दव ठाकरेंचे भाषण अधिक लोकांनी पाहिले तर शिंदेचे भाषण कमी लोकांनी पाहिले, शिवाय लाईक करणाऱ्यांची संख्याही कमी अशा अनेक बारीक पैलूंवर प्रकाशझोत टाकत उध्दव ठाकरे यांच्या सोशल मिडिया सेलने हे मुद्देच अधोरेखित करत उध्दव ठाकरेंचे भाषण कशाप्रकारे शिंदे यांच्यापेक्षा सरस झाले हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शिवसेना रायगड, आम्ही निष्ठावंत अशा फेसबूकवरील ग्रुपवरून तसेच काही वैयक्तिक ट्रोलर्सकडून शिवसेनेच्या सभांचा आणि भाषणांचा समाचार घेतला गेल्याचे पहायला मिळत आहे. (UBT Shiv Sena)

(हेही वाचा – Devendra Fadanvis : ‘मी पुन्हा येईन’ची चर्चा पुन्हा का झाली ?)

एका ट्रोलर्सने तर टिव्ही ९च्या स्क्रिन शॉट टाकून ‘प्रत्येकी हजार रुपये देऊन मिंधे गटाचे आमंत्रण, निष्टावंताचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच’ फरक स्पष्ट आहे, उध्दव ठाकरेंचा भाषण करताना फोटो टाकून त्यावर ताठ मानेचं भाषण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा फोटो टाकून मान खाली घालून केलेलं वाचन अशाप्रकारची पोस्ट टाकली आहे. उबाठा शिवसेनेकडील सोशल मिडिया सेल पाहणारी टिम सध्या शिवसेनेकडे गेली असून उबाठा शिवसेनेच्या सोशल मिडिया सेलची जबाबदारी शिवसेना सचिव वरुण सरदेसाई आणि साईनाथ दुर्गे ही मंडळी पाहत आहेत. मात्र, दुसरीकडे शिवसेनेचे मिडिया सेलकडून कोणत्याही प्रकारे ठाकरे आणि त्यांच्या सभांबाबत ट्रोल करताना दिसत नाही. (UBT Shiv Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.