Madhya Pradesh Election : भाजपने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी

महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांची नावेही या यादीमध्ये आहेत.

22
Madhya Pradesh Election : भाजपने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी
Madhya Pradesh Election : भाजपने जाहीर केली स्टार प्रचारकांची यादी

मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यापार्श्वभूमीवर राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत. भाजपने मध्य प्रदेशच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात ४० नेत्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांची नावेही या यादीमध्ये आहेत. (Madhya Pradesh Election )
मध्य प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर लावला आहे. मात्र, मध्य प्रदेशात भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होणार आहे. मधल्या दीड वर्षाचा अपवाद वगळता २००३ पासून इथे भाजपाची सत्ता आहे. हे नेते मध्य प्रदेशातील पक्षाची आघाडी सांभाळतील आणि उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचार करतील.

(हेही वाचा : Mumbai Tree Cutting : भाजपा आमदार आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप, म्हणाले…)

भाजप आणि काँग्रेसमध्ये ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळणार आहे. भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी पूर्ण जोर लावला असून आक्रमक भूमिका घेतली आहे. ३ डिसेंबरला निकाल लागेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.