Mumbai University : महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थांना मनस्ताप; मुंबई विद्यापीठ करणार कारवाई

आज झालेल्या परीक्षेमध्ये नवी मुंबईतील केएलई महाविद्यालयांनी 29 विद्यार्थ्यांचे आणि मुंबईतील लीलावती लालजी दयाल रात्र महाविद्यालयातील 8 विद्यार्थ्यांचे परीक्षाअर्जच विद्यापीठाकडे दाखल केले नव्हते.

106
Mumbai University : महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थांना मनस्ताप; मुंबई विद्यापीठ करणार कारवाई
Mumbai University : महाविद्यालयाच्या चुकीमुळे विद्यार्थांना मनस्ताप; मुंबई विद्यापीठ करणार कारवाई

मुंबई विद्यापिठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षेस २७ ऑक्टोबर सकाळपासून सुरुवात झाली. (Mumbai University) तृतीय वर्ष बी.कॉमच्या पाचव्या सत्राची परीक्षा सकाळी सुरू झाली. या वेळी स्टिकर आणि ऑनलाईन उपस्थिती पद्धत सुरू करण्यात आली. आजच्या परीक्षेमध्ये 54 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थिती दर्शविली. यामुळे ऑनलाईन उपस्थिती पद्धत यशस्वी झाल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. (Mumbai University)

(हेही वाचा – Mumbai Tree Cutting : भाजपा आमदार आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप, म्हणाले…)

या वेळी महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांना मनस्ताप झाल्याचे दिसून आले. (Mumbai University) आज झालेल्या परीक्षेमध्ये नवी मुंबईतील केएलई महाविद्यालयांनी 29 विद्यार्थ्यांचे आणि मुंबईतील लीलावती लालजी दयाल रात्र महाविद्यालयातील 8 विद्यार्थ्यांचे परीक्षाअर्जच विद्यापीठाकडे दाखल केले नव्हते. यामुळे हे 37 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित होत होते. परंतु विद्यापिठांनी सदर विद्यार्थ्यांना ऐनवेळेस परीक्षा क्रमांक देऊन या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसविले. या दोन महाविद्यालयांवर विद्यापीठाने नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐनवेळी परीक्षेला बसता आले, तरी तोपर्यंत विद्यार्थाना मनस्तापाला सामोरे जावे लागले. (Mumbai University)

मागच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न 

मागील परीक्षेत काही विद्यार्थ्यांनी आसन क्रमांक व बारकोड चुकीचे लिहिले होते, यामुळे त्यांचे निकाल राखीव राहिले होते, नंतर ते जाहीर करण्यात आले. यावर उपाय म्हणून विद्यापीठाने या हिवाळी सत्रापासून विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक, बारकोड व इतर माहिती असलेली पीडीएफ फाईल प्रत्येक परीक्षा केंद्रांना पाठविली. ती परीक्षा केंद्राने  विद्यापीठाने दिलेल्या स्टिकरवर प्रिंट करून विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेवर चिकटविली.

यावर क्यूआर कोड असल्याने विद्यार्थ्याची सर्व माहिती विद्यापीठास मिळेल आणि या कारणासाठी विद्यार्थ्यांचे निकाल राखीव राहणार नाहीत. तसेच विद्यार्थी परीक्षेत उपस्थित आहे का नाही, यासाठी ऑनलाईन उपस्थिती पद्धत सुरू करण्यात आली.  विद्यार्थ्याची उपस्थिती विद्यापीठाच्या ऑनलाईन उपस्थिती प्रोग्राममध्ये नोंदवली गेली. आज झालेल्या परीक्षेमध्ये 54 हजार 289 विद्यार्थी उपस्थित होते, 3 हजार 64 विद्यार्थी अनुपस्थित होते. यावेळी 4 विद्यार्थ्यांची कॉपी केसमध्ये नोंद करण्यात आली. (Mumbai University)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.