‘मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है’ ; CM Eknath Shinde यांची तूफान फटकेबाजी 

विरोधकांच्या चारही मुंड्या चित करा विरोधी पक्षाने ठाण्याचे नाव घेता कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

120
‘मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है’ ; CM Eknath Shinde यांची तूफान फटकेबाजी 

लोकसभा २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या निवडणुकीचे मतदान २६ एप्रिल पर्यंत दोन टप्प्यात पूर्ण झाले असून, तर तीन टप्पे १ जून पर्यंत पूर्ण होतील. मात्र, उर्वरित तीन टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचारसभा सध्या सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना, भाजपासह महायुतीतील उमेदवाराच्या प्रचारार्थ रॅली, सभा, मेळावे घेताना दिसत आहेत. तसेच उमेदवारी अर्ज भरतानाही उपस्थित राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. यातच विरोधकांवर सडकून टीका करत आहेत. ‘मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. 

(हेही वाचा – Arvind Kejriwal यांच्या जामिनावर ७ मे रोजी सुनावणी)

दरम्यान ठाणे येथे प्रचारसभेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, तुम्ही मागच्या उमेदवाराला मोठ्या संख्येने विजयी केले. त्यांना निवडून आणणण्यासाठी मेहनत घेतली. खरे तर त्या उमेदवाराचे काम करायला कार्यकर्ते तयार नव्हते. त्यामुळे मीच उमेदवार असे समजून मतदान करा, असे मला सर्वांना सांगावे लागले. मात्र, या निवडणुकीत मागचे सर्व विक्रम मोडीत काढा. आपण उमेदवार या भावनेने काम करून विरोधकांच्या चारही मुंड्या चित करा परत, विरोधी पक्षाने ठाण्याचे नाव घेता कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : वीर सावरकर यांचं नाव घेण्याची हिंमत तुमच्यात आहे का? अमित शहा यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल)

एकीकडे देशाला वाचवण्यासाठी लोकशाहीला पुढे नेण्यासाठी तसेच विकास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. दुसरीकडे देश बुडवायला निघालेली इंडिया आघाडी (India Alliance) आहे. देशभक्त त्यांना थारा देणार नाहीत. त्यामुळेच मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है, असे एकनाथ शिंदे म्हणाले.  (CM Eknath Shinde )

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.