Arvind Kejriwal यांच्या जामिनावर ७ मे रोजी सुनावणी

न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने अंमलबजावणी संचालनालयातर्फे हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांना ७ मे रोजी सर्व तयारीनिशी येण्यास सांगितले.

116
Arvind Kejriwal यांना जामीन मंजूर; पण २ जूनला आत्मसमर्पण करावे लागणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी अटकेविरोधात दाखल केलेल्या अंतरिम जामीन याचिकेवर मंगळवार दि. ७ मे रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी (३ मे) या मुद्यावर दोन तास युक्तीवाद झाल्यानंतर खंडपीठाने ईडीला सर्व तयारीनिशी येण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सुनावणी झाली. ईडी (ED) आणि केजरीवाल यांच्या वकिलांमध्ये जवळपास दोन तास युक्तीवाद झाला. यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी ७ मे रोजी घेण्याचे निश्चित केले. (Arvind Kejriwal)

लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election) सुरू आहे. अशात, अटक आणि रिमांडला जास्त वेळ लागत असेल तर अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी घेतली जाऊ शकते. यामुळे केजरीवाल यांना प्रचारात सहभागी होता येईल, असे निरिक्षण न्यायालयाने नोंदविले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने अंमलबजावणी संचालनालयातर्फे हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांना ७ मे रोजी सर्व तयारीनिशी येण्यास सांगितले. अटकेविरुद्ध केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या याचिकेवरील सुनावणीला वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतरिम जामिनावर तपास यंत्रणेची बाजू ऐकून घेण्याचा विचार करत असल्याचे खंडपीठाने सांगितले. यावर राजू यांनी केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला विरोध करणार असल्याचे सांगितले. “आम्ही म्हणत आहोत की आम्ही अंतरिम जामीन ऐक. आम्ही अंतरिम जामीन देऊ असे म्हणत नाही, असे खंडपीठाने सांगितले. (Arvind Kejriwal)

(हेही वाचा – IPL 2024 Nitish Kumar Reddy : सनरायझर्स हैद्राबादचा नवीन स्टार फलंदाज नितिश रेड्डी)

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातही केजरीवाल तुरुंगातच

केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, १६ मार्चपर्यंत केजरीवाल आरोपी नव्हते. मग अचानक काय घडले? यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले की, जोपर्यंत केजरीवाल यांना अटक होत नाही तोपर्यंत ते आरोपी नाहीत. न्यायालयाने ३० एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत केजरीवाल यांच्या अटकेच्या वेळेवर प्रश्न उपस्थित केला होता आणि ही अटक निवडणुकीपूर्वी का झाली? असा प्रश्न ईडीला विचाला होता. न्यायालयाने ईडीला आणखी चार प्रश्नांची उत्तरे मागितली होती. एवढेच नव्हे तर, न्यायालयाने केजरीवाल यांनाही ईडीच्या नोटीसकडे दुर्लक्ष का केले? असा प्रश्न विचारला. (Arvind Kejriwal)

केजरीवाल यांना २१ मार्च रोजी अटक करण्यात आली होती. १ एप्रिल रोजी केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. २३ एप्रिल रोजी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्याची न्यायालयीन कोठडी ७ मे पर्यंत वाढवली होती. मतदानाच्या तिसऱ्या (७ मे) टप्प्यातही केजरीवाल तुरुंगातच राहतील. (Arvind Kejriwal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.