Crime : दिवंगत पोलीस उपायुक्त यांच्या पत्नीला खोलीत डांबून ४४ वर्षाच्या मुलाची हत्या

४ एप्रिल रोजी विशाल आणि आई रोहिणी हे दोघे हॉटेल मधून सामान घेऊन न जाता बाहेर पडले आणि त्यानंतर दोघे हॉटेलवर परतले नाही.

259
Crime : दिवंगत पोलीस उपायुक्त यांच्या पत्नीला खोलीत डांबून ४४ वर्षाच्या मुलाची हत्या

दिवंगत निवृत्त पोलीस उपायुक्त यांच्या ४४ वर्षीय मुलाची हत्या करून ८० वर्षीय पत्नीला गुंगीचे औषध पाजून एका खोलीत डांबून ठेवण्यात आल्याची खळबळ जनक घटना मुंबईतील पूर्व उपनगरात उघडकीस आली आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडला असून चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली असून दोन जण फरार असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Crime)

(हेही वाचा – Rape Case : ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल)

विशाल वसंत कांबळे (४४)असे दिवंगत निवृत्त पोलीस उपायुक्त यांच्या मुलाचे नाव असून पोलिसांनी वडोदरा अहमदाबाद येथून त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तर रोहिणी वसंत कांबळे (८०) यांची गोरेगाव पूर्व रॉयल पाम येथील एका खोलीतून सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी रोहिणी यांचा भाचा प्रणव रामटक्के (२५) याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. संपत्तीच्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे.(Crime)

संपत्तीवरून वाद

२००१ मध्ये मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले पोलीस उपायुक्त वसंत कांबळे हे मूळचे कोल्हापूर येथे राहण्यास होते. रोहिणी कांबळे (८०) या त्यांच्या पत्नी असून विशाल कांबळे (४४) त्यांचा मुलगा आहे. काही वर्षांपूर्वी निवृत्त पोलीस उपायुक्त वसंत कांबळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या सर्व संपत्तीचा मालकी हक्क पत्नी रोहिणी आणि मुलगा विशाल यांच्याकडे होता. कोल्हापूर मध्ये शेकडो एकर जमीन, बंगला तसेच मुंबईत देखील त्यांची संपत्ती होती. मुंबईतील चेंबूर लालाडोंगर या ठिकाणी कांबळे यांचा एक बंगला असून या बंगल्याचा वाद कौर्टात सुरू आहे. रोहिणी कांबळे यांचा भाचा प्रणव हा गावाकडील जमीन विकून त्यात हिस्सा मागत होता, किंवा मृत्युपत्र तयार करून त्यात माझ्या नावावर काही संपत्ती करून द्यावी अशी मागणी करीत होता. परंतु विशाल आणि रोहीणी यांचा त्याला विरोध होता. (Crime)

अशी घडली घटना

मुंबईतील चेंबूर लालाडोंगर या ठिकाणी वसंत कांबळे यांचा एक बंगला आहे, या बंगल्याचा वाद मुंबईतील न्यायालयात सुरू आहे. मुलगा विशाल आणि पत्नी रोहिणी हे दोघे मुंबईत न्यायालयीन कामकाजासाठी नेहमी मुंबईत येत असे व चेंबूर येथे हॉटेल निलकमल या ठिकाणी थांबत असे. १३ मार्च रोजी विशाल आणि आई रोहिणी हे दोघे नेहमी प्रमाणे मुंबईत न्यायालयीन कामकाजासाठी आले होते, व हॉटेल निलकमल येथे थांबले होते. ४ एप्रिल रोजी विशाल आणि आई रोहिणी हे दोघे हॉटेल मधून सामान घेऊन न जाता बाहेर पडले आणि त्यानंतर दोघे हॉटेलवर परतले नाही. (Crime)

चेंबूर येथे राहणाऱ्या रोहिणी यांची बहीण विनया फणसळकर (८०) यांनी रोहिणी आणि भाचा विशाल यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचे फोन बंद असल्यामुळे दोन दिवसांनी त्या स्वतः हॉटेल निलकमल येथे आल्या व त्यांनी हॉटेल मॅनेजरकडे चौकशी केली असता दोघे ४ एप्रिल पासून रूम वर नाही, त्यांचे सामान रूम मध्ये असल्याचे हॉटेल मॅनेजर यांनी सांगितले. विनया यांनी २१ एप्रिल रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. (Crime)

चेंबूर पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी हॉटेलच्या बाहेरील सीसीटीव्ही तपासले असता सीसीटीव्ही मध्ये दोन संशयित व्यक्ती विशाल आणि रोहिणी यांना सोबत घेऊन जातांना आढळून आले. पोलिसांनी यादोघांची माहिती काढून त्याचा शोध घेतला असता मुनिर पठाण रोहित अंदमाने उर्फ मुसा पारकर या दोघांना वडाळा आणि पवई येथून पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता दोघांनी आपल्या इतर पाच सहकाऱ्याच्या मदतीने विशाल याला जमीन दाखविण्याच्या निमित्ताने पनवेल येथे नेले व त्या ठिकाणी त्याची हत्या करून मृतदेह वडोदरा अहमदाबाद रोड येथे टाकला व रोहिणी यांना गुंगीचे औषध देऊन गोरेगाव आरे कॉलनी रॉयल पाम या ठिकाणी एका खोलीत कोंडून ठेवले असल्याची माहिती या दोघांनी पोलिसांना दिली. (Crime)

हेही पहा –

चेंबूर पोलिसांनी रॉयल पाम येथून रोहिणी यांची सुटका करून ज्योती वाघमारे (३३) हिला अटक केली. सुटका करण्यात आलेल्या रोहिणी यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चेंबूर पोलिसांनी या प्रकरणी हत्या,अपहरण, गुंगीचे औषध देऊन कोंडून ठेवणे, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून मुनीर अमिन पठाण, (४१) निलंबित बेस्ट बस चालक, रोहित अनिल अदमाने उर्फ मुसा पारकर, (४०), राजू बाबू दरवेश, (४०),ज्योती सुरेश बाघमारे (३३),प्रणव प्रदिप रामटेके(२५) यांना अटक करण्यात आली असून सायरा खान आणि इरफान शेख हे दोघे फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच चेंबूर पोलिसाचे एक पथक मृतदेहाचा शोध घेण्यासाठी अहमदाबाद येथे रवाना झाले आहे. (Crime)

प्रणव रामटेके हा विशाल कांबळे यांचा नातलग असून संपत्तीच्या वादातून त्याने मुनिर पठाण याला विशाल कांबळे आणि रोहिणी कांबळे यांच्या हत्येची सुपारी दिली होती अशी माहिती समोर येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.