Crime News: २२ हत्या करणारा मोस्ट वाँटेड आरोपी साधूच्या वेशात रामलल्लाच्या दर्शनाला गेला, आणि…

226
Crime News: २२ हत्या करणारा मोस्ट वाँटेड आरोपी साधूच्या वेशात रामलल्लाच्या दर्शनाला गेला, आणि...
Crime News: २२ हत्या करणारा मोस्ट वाँटेड आरोपी साधूच्या वेशात रामलल्लाच्या दर्शनाला गेला, आणि...

मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात २२ हत्या करणारा (Crime News) ) मोस्ट वाँटेड आरोपी किशोर तिवारी (Kishore Tiwari) उर्फ किस्सू तिवारी याला पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली आहे. किस्सू तिवारी अयोध्येत (ayodhya) रामलल्लाच्या दर्शनासाठी आला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. मध्य प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर ५५ हजारांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. त्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस आणि मध्य प्रदेश पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवली. (Crime News)

२० गुन्हे दाखल

किस्सू तिवारीच्या विरोधात २२ हत्यांचा आरोप आहे. तसंच त्याला अटक करण्यासाठी ८ डिसेंबर २०२१ पासून वॉरंट लागू करण्यात आला आहे. किस्सूच्या विरोधात हत्येचे कटनीमध्ये २० गुन्हे दाखल आहेत तर इंदूर आणि जबलपूर या ठिकाणी प्रत्येकी एक एक गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध मागच्या दीड वर्षापासून सुरु होता. अखेर राम मंदिरातून नाट्यमय पद्धतीने त्याला अटक करण्यात आली आहे. (Crime News)

(हेही वाचा –Ujani dam: उजनी धरणात बुडालेल्या सहापैकी तिघांचे मृतदेह सापडले!)

किशोर तिवारीला अटक करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांचं नेटवर्कही सक्रिय केलं होतं. जबलपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदित्य प्रताप सिंह आणि कटनीचे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिजित रंजन यांनी संयुक्त बैठक घेतली. तसंच आरोपी किस्सू तिवारीला अटक करण्याचे निर्देश दिले होते. किस्सूला अटक करण्यासाठी पोलिसांची पथकंही तयार करण्यात आली होती. पोलिसांनी खबऱ्यांचं नेटवर्क कामाला लावलं होतं आणि किस्सूची काही माहिती समोर येते का त्याचा अंदाज घेतला जात होता. (Crime News)

(हेही वाचा –Ujani dam: उजनी धरणात बुडालेल्या सहापैकी तिघांचे मृतदेह सापडले!)

पोलिसांना खबऱ्यांकडून किस्सू तिवारी हा अयोध्येतील राम मंदिरात दर्शन घेण्यासाठी येणार आहे ही माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी किशोर तिवारी उर्फ किस्सू तिवारीला अटक करण्यासाठी सापळा रचला. किस्सू तिवारी वेशांतर करुन म्हणजेच साधूच्या वेशात अयोध्येतील राम मंदिरात आला. त्यावेळी कटनीच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याला अटक केली. किस्सूला आता कटनी या ठिकाणी आणण्यात आलं आहे. किस्सू तिवारी पोलिसांना चकमा देऊन फरार झाल्यानंतर जयपूर, हरिद्वार, हिमाचल अशा ठिकाणी जाऊन लपला होता. प्रत्येक वेळी तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.