Ozar Airport: बेंगळुरूसाठी दररोज विमानसेवा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या वेळापत्रक

ओझर विमानतळावरून सध्या 'इंडिगो' या एकमेव कंपनीची सेवा सुरू असून, नवी दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा व इंदूर या ६ शहरांसाठी सेवा दिली जात आहे.

196
Ozar Airport: बेंगळुरूसाठी दररोज विमानसेवा कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या वेळापत्रक

नाशिककरांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली असून, नाशिक-बेंगळुरू विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १० सप्टेंबरपासून ओझर विमानतळावरून (Ozar Airport) बेंगळुरूसाठी दररोज थेट विमानसेवा सुरू होत आहे. या सेवेची बुकिंगही सुरू झाली असून, यामुळे नाशिकच्या उद्योग, पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे.

ओझर विमानतळावरून (Ozar Airport) सध्या ‘इंडिगो’ (Indigo) या एकमेव कंपनीची सेवा सुरू असून, नवी दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा व इंदूर या ६ शहरांसाठी सेवा दिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच इंदूर आणि अहमदाबादच्या सेवेत कपात करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती, मात्र त्यानंतर १ मेपासून नवी दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरू झाल्याने नाशिककरांची महत्त्वाची मागणी पूर्ण झाली.

(हेही वाचा – Crime News : पत्नीच्या जाचाला कंटाळून पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या )

या सेवेमुळे नाशिकला उत्तर भारताची थेट कनेक्टिव्हिटी लाभली. नाशिककरांची दुसरी मागणी बेंगळुरू सेवेची होती. निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तान आदी संघटनांकडून या सेवेसाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर ‘इंडिगो’ने सकारात्मक प्रतिसाद देत या सेवेला हिरवा कंदील दाखवला आहे. आयटी क्षेत्र व पर्यटनाच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.

बेंगळुरू-नाशिक प्रवास विमानाने करण्यासाठी…
बेंगळुरू येथून दररोज दुपारी २.३० वाजता १८० आसनी विमान उड्डाण घेऊन ते सायंकाळी ४.२० वाजता नाशिकला पोहोचेल. हेच विमान सायंकाळी ४.५० वाजता नाशिकहून भरारी घेऊन ६.३५ वाजता बेंगळुरूला पोहोचेल. या सेवेचे बुकिंग सुरू झाले असून, सुमारे साडेचार हजारांपासून पुढे तिकीटदर राहतील.

या सेवेमुळे नाशिककरांना आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. अनेक कंपन्यांची मुख्यालये बेंगळुरूला असल्याने नाशिकमध्ये गुंतवणूकदेखील येण्याची शक्यता आहे, असे मत उद्योजक मनीष रावल यांनी व्यक्त केले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.