Weather Update: पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला! अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार

191
Weather Update: पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला! अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार
Weather Update: पाकिस्तानी वाऱ्यांमुळे महाराष्ट्र तापला! अनेक ठिकाणी पारा चाळीशीपार

पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तान (Afghanistan) मार्गे वेगाने वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या तापमानात (Weather Update) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुढील आणखी काही दिवस याचा त्रास होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. (Weather Update)

(हेही वाचा –Railway line desilting : रेल्वे हद्दीतील कल्व्हर्ट अद्यापही नाही साफ; अतिरिक्त आयुक्तांनी दिले पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश)

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ताशी ३५ ते ४० किमी वेगाने उष्ण वारे गुजरातमध्ये वाहत आहे. दक्षिणोत्तर हवेच्या निर्वात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वारे महाराष्ट्रात देखील येत आहे. परिणामी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह (Mumbai) कोकण (Kokan) किनारपट्टी, सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Update)

(हेही वाचा –Indian film director: सामाजिक समस्या दर्शवणारे चित्रपट दिग्दर्शक कोण?)

एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे राज्यात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. काही ठिकाणी घरांवरील पत्रेही उडून गेली आहेत. हवामान खात्याने गुरुवारपासून (२२ मे) पुढील ३ ते ४ दिवस राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. (Weather Update)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.