SDRF पथकाची बोट उलटली, पथकातील तिघांचा मृत्यू!

133
SDRF पथकाची बोट उलटली, पथकातील तिघांचा मृत्यू!
SDRF पथकाची बोट उलटली, पथकातील तिघांचा मृत्यू!

उजनी धरणातील बोट दुर्घटना ताजी असतानाच आता अकोलेमधील अहमदनगर- प्रवरा नदीत एसडीआरएफची (SDRF) बोट उलटली आहे. यामध्ये पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे. एका बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गेले असताना एसडीआरएफ पथकाची बोट उलटली. (SDRF)

SDRF पथकातील तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू 

या बोट दुर्घटनेत ५ जण बुडाले आहेत. दोघांचा शोध सुरू आहे, तर तिघांचा मृत्यू झाला आहे. पथकातील चारजणांसह १ स्थानिक बुडाला आहे. अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळची ही घटना आहे. SDRF पथकातील तिघांचा मृत्यू तर दोघांचा शोध सुरू आहे. काल दोन जण बुडाले होते. त्यातील एकाला शोधण्यासाठी सकाळी SDRF चे पथक बोलावले होते. (SDRF)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.