Lok Sabha Election 2024: भाजपाला किती जागा मिळणार? अमेरिकन राजकीय संशोधकाने सांगितला आकडा

340
Lok Sabha Election 2024: भाजपाला किती जागा मिळणार? अमेरिकन राजकीय संशोधकाने सांगितला आकडा
Lok Sabha Election 2024: भाजपाला किती जागा मिळणार? अमेरिकन राजकीय संशोधकाने सांगितला आकडा

भाजपाला यंदाही बहुमत (Lok Sabha Election 2024) मिळेल असं मत राजकीय आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी व्यक्त केलं होतं. यंदाच्या निवडणुकीत भाजपाला ३०० पेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील. असं प्रशांत किशोर म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांमधील एकूण ४२८ जागांवरील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता केवळ दोन टप्प्यांमधील ११५ जागांवरील मतदान बाकी आहे. अशातच आता ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा –Lok Sabha Election 2024 : कॉंग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, राहुल गांधींसमोरच २ नेते भिडले)

प्रशांत किशोर यांच्यापाठोपाठ अमेरिकेतील निवडणुकांचे अभ्यासक, राजकीय संशोधक तथा रणनीतीकार इयान ब्रेमर (Ian Bremer) यांनीदेखील भारतातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे. इयान ब्रेमर हे यूरेशिया समूहाचे संस्थापक आहेत. ही एक रिस्क अँड रिसर्च कन्सल्टन्सी (Risk and Research Consultancy) (जोखीम आणि संशोधन) कंपनी आहे. इयॉन ब्रेमर यांनी एनडीटीव्हीला यासंबंधी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला ३०५ (+/- १०) जागा मिळतील.” म्हणजेच भाजपा जास्तीत जास्त ३१५ किंवा कमीत कमी २९५ जागा जागा जिंकू शकते.” (Lok Sabha Election 2024)

भारताच्या निवडणुकांबाबत यूरेशियन रिसर्च ग्रुपचा अंदाज

ब्रेमर म्हणाले, “सध्या जगभरातल्या राजकारणात भारतातल्या निवडणुका सर्वात स्थिर वाटत आहेत. अन्यथा इतरत्र आम्हाला समस्याच समस्या दिसतायत. भारताच्या निवडणुकांबाबत यूरेशियन रिसर्च ग्रुपचा अंदाज आहे की, भाजपाला (BJP) देशात २९५ ते ३१५ जागा मिळू शकतात. असं झाल्यास भाजपाचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय असेल. भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २८२ तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या.” अशी माहिती त्यांनी दिली. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.