Ujani dam: उजनी धरणात बुडालेल्या सहापैकी तिघांचे मृतदेह सापडले!

85
Ujani dam: उजनी धरणात बुडालेल्या सहापैकी तिघांचे मृतदेह सापडले!
Ujani dam: उजनी धरणात बुडालेल्या सहापैकी तिघांचे मृतदेह सापडले!

उजनी धरणात (Ujani dam) बोट उलटून बुडालेल्या सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह सापडले आहेत. गुरूवारी (२३ मे) रोजी मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान शोधकार्याला सुरुवात करण्यासाठी उजनी धरणाच्या परिसरात दाखल झाले. यावेळी तीन जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. यानंतर एनडीआरएफचे जवान हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले आहेत. हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर त्यांची ओळख पटवली जाईल. (Ujani dam)

(हेही वाचा –Share Market fraud: झटपट श्रीमंत होण्याच्या नादात; शेयर मार्केटमध्ये बुडाले कोट्यवधी रुपये )

मंगळवारी (२१ मे) संध्याकाळी सोलापूर जिल्ह्यातील कुगाव पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील काळाशी येथे जाण्यासाठी हे प्रवासी बोटीने निघाले होते. त्यावेळी वादळी वारे वाहू लागल्याने बोट उलटी झाली. यावेळी बोटीवर सात प्रवासी होते. यापैकी एकजण पोहत बाहेर आला होता. त्यामुळे या दुर्घटनेची समोर आली. त्यानंतर उर्वरित सहा जणांचा शोध सुरु होता. (Ujani dam)

शॉर्टकट बेतला जिवावर

करमाळा तालुक्यातील उजनीच्या पट्ट्यातील गावांमधून इंदापूरकडे रस्तामार्गे प्रवास करण्यासाठी शंभर किलोमीटरचा वळसा मारावा लागतो. यासाठी तीन तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र, बोटीतून केवळ पाच ते सात किलोमीटर पाण्यातून हा धोकादायक प्रवास केल्यावर तासाभरात इंदापूर तालुक्यात जाता येते. (Ujani dam)

(हेही वाचा –Pune Accident Case : बाल न्याय मंडळाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ? वाचा सविस्तर)

मात्र, हा जलवाहतुकीचा प्रकार कोणतीही सुरक्षेची साधने जवळ न बाळगताच बेकायदा वाहतूक करतात. बोटचालकदेखील पुरेसा प्रशिक्षित नसल्याने दुर्घटनेवेळी त्यालाही जीव वाचवत येत नाही. त्यामुळे मंगळवारी घडलेल्या घटनेतही असाच प्रकार झाला. त्यातून योग्य खबरदारी न घेतल्यास शॉर्टकट जिवावर बेतू शकतो, हे दिसून आले. (Ujani dam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.