Pune Accident Case : बाल न्याय मंडळाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ? वाचा सविस्तर

191
Pune Accident Case: बाल न्याय मंडळाने घेतला 'हा' मोठा निर्णय ? वाचा सविस्तर

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावं लागणार आहे. दारूच्या नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. अटक झाल्यानंतर त्याला 15 तासांमध्येच जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही हे पोलीस ठरवतील असंही बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे. (Pune Accident Case)

हॉटेलमधील 48 हजारांचे बील न्यायालयासमोर सादर
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांनी बुधवारी सकाळी अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर केलं. त्यावेळी युक्तिवाद करत असताना पोलिसांनी मुलगा दारू प्यायला होता हे न्यायालयाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अल्पवयीन मुलाने कोझी किचन हॉटेलमध्ये भरलेलं 48 हजार रुपयांचे बिलही कोर्टासमोर सादर केलं. तसेच आरोपीने केलेलं कृत्य हे अत्यंत भीषणावह आहे, त्यामुळे त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली. तर दुसरीकडे बचाव पक्षाच्या वकिलांनी मुलगा अल्पवयीन असल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूचे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने अखेर हा आदेश दिला. (Pune Accident Case)

(हेही वाचा – Milind Narvekar : गेले नार्वेकर कुणीकडे?)

नवीन कलमांचादेखील समावेश केला
पुण्यातील कल्याणीनगरमधील अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलावर दाखल गुन्ह्यात पोलिसांनी नव्या कलमाची वाढ केली आहे. त्यानंतर अल्पवयीन आरोपी मुलाने कोर्टात हजेरी लावली आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्याप्रकरणी अल्पवयीन मुलावर 185 कलमाच्या अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याआधी त्याच्यावर कलम 304 अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अल्पवयीन असल्याच्या कारणावरून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. या मुलाला दुपारी 12 वाजता बाल हक्क कोर्टासमोर हजर करण्यात आले. तर आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना अटक करण्यात आली असून त्यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Pune Accident Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.