Crime News: जळगावातील धक्कादायक कृत्य! जुन्या वादातून तरुणाची हत्या

146
Crime News: जळगावातील धक्कादायक कृत्य! जुन्या वादातून तरुणाची हत्या
Crime News: जळगावातील धक्कादायक कृत्य! जुन्या वादातून तरुणाची हत्या

जुन्या वादातून सात ते आठ जणांच्या टोळक्याने हॉटेलमध्ये जेवत असलेल्या तरुणाचा निर्घृण खून (Crime News) केल्याची घटना जळगाव शहरात घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेतील चार जणांना पोलिसांनी (Police) अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Crime News)

(हेही वाचा –Pune Porsche Car Accident: अग्रवाल आणि पवार कुटुंब निकटवर्तीय? नितेश राणेंनी केला खुलासा)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कालिका माता मंदिर (kalika Mata Mandir) परिसरात असलेल्या हॉटेल भानू येथे रात्रीच्या वेळी किशोर सोनवणे (Kishor Sonawane) हा तरुण काही मित्रांच्या समवेत जेवण करत होता. यावेळी हातात काठ्या घेऊन सात ते आठ तरुण हॉटेलमध्ये शिरले. त्यानंतर टोळक्याने किशोर सोनवणेवर हल्ला केला. यामुळे किशोर सोनवणे जागीच मृत्यू झाला. (Crime News)

(हेही वाचा –Pune Porsche Car Accident: अडीच कोटीच्या कारसाठी १७०० रुपये भरणे विशाल अग्रवालांना डोईजड! आरटीओने उचललं मोठं पाऊल)

मृत्यू होऊनही टोळक्याने त्याला मारहाण सुरूच ठेवल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. या घटनेतील आरोपी विरोधात शहरातील शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे. (Crime News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.