IPL 2024, RR vs RCB : दिनेश कार्तिकचा नाबादचा निर्णय का चुकीचा होता?

IPL 2024, RR vs RCB : तिसऱ्या पंचांकडे तंत्रज्जानाची मदत असतानाही त्यांचा कार्तिकला नाबाद ठरवण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे

127
IPL 2024, RR vs RCB : दिनेश कार्तिकचा नाबादचा निर्णय का चुकीचा होता?
IPL 2024, RR vs RCB : दिनेश कार्तिकचा नाबादचा निर्णय का चुकीचा होता?
  • ऋजुता लुकतुके

राजस्थान विरुद्ध बंगळुरू एलिमिनेटर (IPL 2024, RR vs RCB) सामन्यात तिसऱ्या पंचांचा आणखी एक निर्णय बुधवारी वादग्रस्त ठरला. पंचगिरीचा स्तर हा या हंगामात तसाही वादाचा विषय ठरला आहे. पण, इथं टीव्हीवर रिप्ले पाहण्याची सोय असताना पंचांकडून चुकीचा निर्णय दिला गेला का, हा प्रश्न आहे. बंगळुरूचा डाव सुरू असताना पंधराव्या षटकात हा प्रसंग घडला. आवेश खानच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यष्ट्यांच्यासमोर अडकला होता. पायचीतचं अपील खेळाडूंनी केलं. आणि मैदानावरील पंचांनी बादचा इशाराही दिला. त्यावर कार्तिकने तिसऱ्या पंचांकडे अपील केलं. (IPL 2024, RR vs RCB)

(हेही वाचा- Pune Porsche Car Accident: अग्रवाल आणि पवार कुटुंब निकटवर्तीय? नितेश राणेंनी केला खुलासा)

आडव्या बॅटने खेळलेला कार्तिकचा हा फटका चुकला होता. तिसऱ्या पंचांनी अल्ट्रा एजची मदत घेतली. त्यात चेंडूचा कशाशी तरी स्पर्श झाल्याचंही कळलं. पण, चेंडू नक्की बॅटला लागला होता की, बॅट पॅडला लागल्याचा तो संपर्क होता, हे नीट कळत नव्हतं. पण, पंचांनी चेंडू बॅटला लागल्याचा निर्वाळा दिला. कार्तिकला नाबाद दिलं. खरंतर तो आवाज आणि स्पर्श हा बॅट पॅडला लागल्याचा असावा असा दाट संशय समालोचन कक्षातील सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनीही व्यक्त केला. कारण, अल्ट्राएजने संपर्क दाखवला तेव्हा चेंडू बॅटपेक्षा लांब दिसत होता. बॅट मात्र पॅड जवळ होती.  (IPL 2024, RR vs RCB)

पण, अखेर पंचांचा निर्णय हा शेवटचा असतो. त्यामुळे दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) एक जीवदान मिळालं. त्यानंतर कार्तिकने एक चौकार ठोकला. आणि आवेशच्याच गोलंदाजीवर यशस्वी जयसवालकडे (yashasvi jaiswal) झेल देऊन तो ११ धावांवर बाद झाला. अनेक माजी खेळाडूंनीही या निर्णयावर टीका केली आहे. ट्विटरवर तसे संदेश फिरायला सुरुवात झाली आहे. मायकेल वॉल, केविन पीटरसन यांनी सोशल मीडियावर खरमरीत संदेश लिहिले आहेत. तर इरफान पठाणही निर्णयावर नाखुश होता. समालोचन कक्षात रवी शास्त्री यांनीही या निर्णयावर उघड भाष्ट केलं. ‘पंचांना टीव्ही रिप्लेची मदत होती. तरीही असा निर्णय देताना पंचांनी रिप्ले ३-४ वेळा पाहायला हवा होता. अशा महत्त्वाच्या स्पर्धेत पंचगिरीचा स्तरही सर्वोच्चच हवा,’ असं शास्त्री यांनी बोलून दाखवलं. (IPL 2024, RR vs RCB)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.