Lok Sabha Election 2024 : हरियाणाच्या कुरुक्षेत्रात भाजपा-कॉंग्रेस आमने सामने

92
Lok Sabha Election 2024 : हरियाणाच्या कुरुक्षेत्रात भाजपा-कॉंग्रेस आमने सामने
  • वंदना बर्वे

हरियाणातील लोकसभेच्या सर्व १० जागांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यातील दोन कोटी मतदार २५ मे रोजी २२३ उमेदवारांच्या राजकीय भविष्याचा फैसला करणार आहेत. यात २०७ पुरूष आणि १६ महिलांचा समावेश आहे. हरियाणातील १० जागांच्या या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला अग्निपरीक्षा द्यायची असेल तर ती भाजपाला द्यावी लागणार आहे. कारण, विद्यमान सर्व १० खासदार हे भाजपाचेच आहेत. यामुळे या सर्व जागा आपल्याकडे कायम ठेवण्याचे आव्हान भाजपापुढे आहे. कॉंग्रेससाठी देखील आव्हान आहे. पण काँग्रेस पक्षाकडे हरियाणात गमाविण्यासारखे काहीच नाही. (Lok Sabha Election 2024)

भाजपाचा हरियाणामध्ये खरा ग्राफ वाढला तो २०१४ मध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजपाने हरियाणातील ७ जागा जिंकल्या होत्या आणि २०१९ मध्ये सर्व १० जागांवर आपला झेंडा फडकविला. मतांची टक्केवारी सुध्दा ४१ हून ५८ टक्क्यांवर पोहचली. आता भाजपाला १० जागा आपल्याकडे कायम ठेवायच्या आहेत आणि कॉंग्रेस त्या हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात आहे. दोन्ही पक्षांच्या डावपेचामुळे हरियाणातील वातावरण आता रोमांचक वळणावर आले आहे. (Lok Sabha Election 2024)

भाजपाचा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि त्याच्या काळात झालेल्या विकासकामाच्या अवतीभोवती केंद्रित आहे. रणनितीकार यासाठी खास मुद्द्यांची माहिती नेत्यांना भाषणासाठी देत आहेत. दुसरीकडे, कॉंग्रेस पक्ष स्थानिक समस्यांवर सर्वाधिक भर देण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे सत्ताविरोधी लाटेचा फायदा मिळण्याची आशा कॉंग्रेसला आहे. माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी तर लोकसभेच्या निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीशी जोडले आहे. (Lok Sabha Election 2024)

हरियाणातील कुरुक्षेत्राच्या मैदानात भाजपा आणि कॉंग्रेस आमने सामने उभे असले तरी जेजेपी आणि आयएनएलडीसारखे अन्य स्थानिक पक्ष सुध्दा रिंगणात आहेत. कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडी झाली असून कॉंग्रेस ९ तर आप एक जागा लढविणार आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Pune Porsche Car Accident: अग्रवाल आणि पवार कुटुंब निकटवर्तीय? नितेश राणेंनी केला खुलासा)

कुरुक्षेत्र – नवीन जिंदाल (भाजपा), अभय चौटाला (इंडियन नॅशनल लोकदल) आणि सुशील गुप्ता (आप)

अंबाला – बंतो कटारिया (भाजपा), वरूण चौधरी (कॉंग्रेस)

सिरसा – अशोक तंवर (भाजपा) आणि कुमारी शैलजा (कॉंग्रेस)

हिसार – रणजित सिंह चौटाला (भाजपा), जय प्रकाश (कॉंग्रेस) आणि नयना चौटाला (जेजेपी).

करनाल – माजी मुख्यमंत्री मनोहर लाल (भाजपा), दिव्यांशु बुध्दीराज (कॉंग्रेस)

सोनीपत – मोहनलाल बडोली (भाजपा), सतपाल ब्रम्हचारी (कॉंग्रेस)

रोहतक – अरविंद कुमार शर्मा (भाजपा), दीपेंदरसिंग हुडा (कॉंग्रेस)

भिवानी-महेंद्रगड – चौधरी धर्मवीर सिंग (भाजपा), रावदान सिंग (कॉंग्रेस), राव बहादुर सिंग (जजपा)

गुडगाव – माजी केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंग (भाजपा), राजबब्बर (कॉंग्रेस) राहुल यादव फाजिलपुरिया (जजपा)

फरिदाबाद – कृष्णपाल गुर्जर (भाजपा), महेंद्र प्रताप (कॉंग्रेस), नलिन हुडा (जजपा) (Lok Sabha Election 2024)

महत्वाचे म्हणजे, राज्यात एकही जागा नसलेल्या कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आली आहे. कॉंग्रेस नऊ जागा लढत आहे. यातील आठ उमेदवार हे भूपेंद्र सिंह हुड्डा यांचे समर्थक आहेत. तर, कुमारी शैलजा या सिरसामधून स्वबळावर फाईट देत आहेत. मात्र, त्यांच्या मदतीला चौधरी विरेंद्र सिंग, रणजीत सुरजेवाला आणि किरण चौधरी आहेत. हुडा सिरसाला एकदाही प्रचाराला गेले नाहीत. तर शैलजा यांनी सुध्दा त्यांना बोलाविण्याची तसदी घेतली नाही. (Lok Sabha Election 2024)

कुरूक्षेत्राची जागा आपला गेली असून सुशील गुप्ता इंडी आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात आहेत. हुडा दिवसभर सर्व मतदारसंघात फिरतात. परंतु, रात्री रोहतकमध्ये येतात. कारण मुलगा दीपेंदर हुडा येथून मैदानात आहेत. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.