IPL 2024, Virat Kohli : आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा विराट पहिला खेळाडू

125
IPL 2024, Virat Kohli : आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा विराट पहिला खेळाडू
IPL 2024, Virat Kohli : आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा विराट पहिला खेळाडू
  • ऋजुता लुकतुके

३५ वर्षीय विराट कोहलीसाठी (IPL 2024, Virat Kohli) आता विक्रम ही नवीन गोष्ट राहिलेली नाही. तो खेळायला मैदानात उतरला की, कुठल्या ना कुठल्या बाबतीत नवा उच्चांक प्रस्थापित होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच आयपीएलमध्येही विराट हे फलंदाजीतील चलनी नाणं आहे. यंदाच्या हंगामात बंगळुरचं आव्हान एलिमिनेटर लढतीनंतर संपुष्टात आलं आहे. पण, विराटकडे सध्या तरी ७४१ धावांसह ऑरेंज कॅप आहे. दोन हंगामात ७०० हून अधिक धावा करणारा ख्रिस गेल (Chris Gayle) नंतर तो फक्त दुसरा फलंदाज आहे. (IPL 2024, Virat Kohli)

(हेही वाचा- Pune Porsche Car Accident: अग्रवाल आणि पवार कुटुंब निकटवर्तीय? नितेश राणेंनी केला खुलासा)

त्यातच या हंगामात त्याने अशी कामगिरी केली आहे, जी आयपीएलमध्ये इतर कुठल्याही फलंदाजाने केलेली नाही. आयपीएलमध्ये ८,००० धावांचा टप्पा गाठणारा तो पहिली फलंदाज आहे. त्याचं सातत्य, कौशल्य आणि प्रभूत्व यातून सिद्ध होतं. २००८ च्या हंगामापासून तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सोबत आहे. आणि २०२४ च्या हंगामात राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळताना हा मापदंड त्याने सर केला. (IPL 2024, Virat Kohli)

बंगळुरू संघाचा माजी कर्णधार आपला २५२ वा सामना खेळत होता. यात त्याने ८ शतकं आणि ५५ अर्धशतकं केली आहेत. सातत्याने धावा करण्याबरोबरच दडपणाखाली चांगली कामगिरी करण्यासाठी तो ओळखला जातो. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना तो भरवशाचा फलंदाज आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध ध्रुव जुरेलला धावचीत करताना त्याची तंदुरुस्ती आणि मैदानावर हार न मानण्याची वृत्तीही दिसून आली. (IPL 2024, Virat Kohli)

(हेही वाचा- IPL 2024, RR vs RCB : दिनेश कार्तिकचा नाबादचा निर्णय का चुकीचा होता?)

विराटने या हंगामातही ७४१ धावा केल्या आहेत. पण, त्याचा संघ मात्र स्पर्धेतून बाद झाला आहे. आयपीएलमध्ये धावांच्या बाबतीत पंजाब किंग्जचा शिखऱ धवन (Shikhar Dhawan) ६,७६९ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ६६२८ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. (IPL 2024, Virat Kohli)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.