Pune Porsche Car Accident: अडीच कोटीच्या कारसाठी १७०० रुपये भरणे विशाल अग्रवालांना डोईजड! आरटीओने उचललं मोठं पाऊल

254
Pune Porsche Car Accident: अडीच कोटीच्या कारसाठी १७०० रुपये भरणे विशाल अग्रवालांना डोईजड! आरटीओने उचललं मोठं पाऊल
Pune Porsche Car Accident: अडीच कोटीच्या कारसाठी १७०० रुपये भरणे विशाल अग्रवालांना डोईजड! आरटीओने उचललं मोठं पाऊल

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये (Pune Porsche Car Accident) घडलेल्या अपघातानंतर आरटीओने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आलिशान पोर्श कारची तात्पुरती नोंदणी रद्द करण्यात आली आहे. कारची तात्पुरती नोंदणी 18 मार्चला झाली होती. पुण्यातीस आरटीओमध्ये कारच्या नोंदणीसह इतर शुल्क अशी १७५८ रुपयांची रक्कम न भरल्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता या कारची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला याबाबत नोटीस बजावली जाणार आहे. कारची तात्पुरती नोंदणी रद्द झाल्यानंतर तिची पुढील 12 महिने नोंदणी करता येणार नाही. (Pune Porsche Car Accident)

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही

या नोंदणीची मुदत 17 सप्टेंबरपर्यंत वैध आहे. ही कार पुण्यात आल्यानंतर 18 एप्रिलला नोंदणीसाठी ती पुण्यातील आरटीओमध्ये नेण्यात आली. तिथे आरटीओतील निरीक्षकाने तिची तपासणी केली. तिच्या नोंदणीसह इतर शुल्क अशी 1 हजार 758 रुपयांची रक्कम न भरल्याने नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता या कारची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला याबाबत नोटीस बजावली जाणार आहे. कारची तात्पुरती नोंदणी रद्द झाल्यानंतर तिची पुढील 12 महिने नोंदणी करता येणार नाही. (Pune Porsche Car Accident)

… म्हणून नोंदणी रखडली

अपघातग्रस्त कार बंगळुरुच्या एका डीलरकडून आली आहे. या कारसाठी बेंगळुरू सेंट्रल आरटीओकडून तात्पुरती नोंदणी करण्यात आली होती जी, 18 मार्च 2024 ते 17 सप्टेंबर 2024 पर्यंत वैध होती. नंतर 18 एप्रिल 2024 रोजी मालकाने कार पुण्यात आरटीओमध्ये नोंदणीसाठी आणली होती. येथे कारची तपासणी केली गेली आणि मंजुरीही देण्यात आली. मात्र याचे शुल्क भरले गेले नाही म्हणून कारसाठी नोंदणी क्रमांक जारी केला गेला नाही. (Pune Porsche Car Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.