Sangali LS constituency : सांगलीत शिवसेना उबाठाचा गेम, स्नेहभोजनाने शिक्कामोर्तब

Sangali LS constituency : लोकसभा निवडणुकीत सांगली मतदार संघात काँग्रेसने शिवसेना उबाठाचा गेम केल्याचे आता उघड झाले आहे.

285
Sangali LS constituency : सांगलीत शिवसेना उबाठाचा गेम, स्नेहभोजनाने शिक्कामोर्तब
Sangali LS constituency : सांगलीत शिवसेना उबाठाचा गेम, स्नेहभोजनाने शिक्कामोर्तब

लोकसभा निवडणुकीत सांगली मतदार संघात काँग्रेसने (Congress) शिवसेना उबाठाचा (Shiv Sena UBT) गेम केल्याचे आता उघड झाले आहे. सांगलीत स्थानिक काँग्रेस पक्षातर्फे बुधवारी २२ मे रोजी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याला काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) आणि त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam) यांनी प्रमुख उपस्थिती लावल्याने सांगली काँग्रेसने विशाल पाटलांना समर्थन दिले आणि त्यांचेच काम केल्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. (Sangali LS constituency)

(हेही वाचा- IPL 2024, RR Vs RCB : रॉयल लढतीत राजस्थानचा विजय, बंगळुरू स्पर्धेतून बाद)

उबाठाच्या उमेदवारीवर नाराजी

सांगली मतदार संघात शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरू असताना सांगलीत जाऊन परस्पर चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी घोषित केली. यामुळे काँग्रेसमध्ये (Congress) नाराजीचा सूर उमटू लागला होता. स्थानिक काँग्रेसने या उमेदवारीला विरोधही केला. (Sangali LS constituency)

काँग्रेसचा विशाल पाटलांसाठी आग्रह

काँग्रेसचे (Congress) आमदार विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील (Vasantdada Patil) यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवसेना उबाठाने मात्र चंद्रहार यांच्या उमेदवारीचा हट्ट सोडला नाही. अखेर कदम यांनी थेट दिल्ली गाठत काँग्रेस हाय कमांडकडे विशाल पाटील याच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला. पण काँग्रेसने उबाठाशी जुळवून घेण्याचा सल्ला दिला. (Sangali LS constituency)

(हेही वाचा- Pune Porsche Car Accident: अडीच कोटीच्या कारसाठी १७०० रुपये भरणे विशाल अग्रवालांना डोईजड! आरटीओने उचललं मोठं पाऊल)

काँग्रेसची बंडखोरी

काँग्रेस (Congress) हाय कमांडचे न ऐकता विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेयवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने मात्र त्यांच्यावर कोणतीही शिस्तभांगाची कारवाई केली नाही. आजही विशाल पाटील (Vishal Patil) काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून स्नेहभोजनाला उपस्थित राहिले. ७ मे ला या मतदार संघात मतदान झाले आणि शिवसेना उबाठा पदाधिकाऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध तुटला. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे काँग्रेसबाबत तक्रार केली. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांच्यासाठी नव्हे तर विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेस पक्षाने काम केले. राज्य पातळीवरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचादेखील विशाल पाटील यांना पाठींबा होता आणि त्यांनी विशाल पाटील यांचा प्रचार केला, अशी तक्रार शिवसेना उबाठाकडून करण्यात आली. आता उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र सांगलीत दिसत आहे. (Sangali LS constituency)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.