Ahilyanagar Chikki : चिक्कीचे पॅकेट उघडताच बसला धक्का; हातावर आल्या जिवंत अळ्या, FDA काय कारवाई करणार?

माळीवाडा बसस्थानक परिसरातून एका प्रवाशाने चिक्कीचे पाकीट खरेदी केले असता, त्यामध्ये अळ्या असल्याचे त्याच्या निदर्शनास आले

101
Ahilyanagar Chikki
अहिल्यानगरमधून धक्कादायक प्रकार उघड!

Ahilyanagar Chikki : प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणारा एक धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात उघडकीस आला आहे. एका प्रवाशाने विकत घेतलेल्या चिक्कीच्या पाकिटामध्ये चक्क जिवंत अळ्या आढळल्याने एकच खळबळ उडाली. उपलब्ध माहितीनुसार, माळीवाडा बसस्थानक परिसरातील दुकानातून एका प्रवाशाने चिक्कीचे पाकीट खरेदी केले. पाकीट उघडल्यानंतर त्यामध्ये अळ्या असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.

हेही वाचा: Nirmal Purja Death : जगविख्यात गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचा गिर्यारोहणादरम्यान दुर्देवी अंत; मृत्यूमागे नेमके कारण काय?

एफडीएच्या अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानाची पाहणी करून चिक्कीचे नमुने तपासणीसाठी जप्त केले. तसेच दुकानातील इतर खाद्यपदार्थांचीही तपासणी करण्यात आली. प्राथमिक स्तरावर अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले आहे का, याची चौकशी सुरू करण्यात आली असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Ahilyanagar Chikki)

या घटनेनंतर बसस्थानक परिसरातील तसेच अन्य ठिकाणी विकल्या जाणाऱ्या पॅकबंद आणि इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मुदतबाह्य, बुरशी लागलेले तसेच निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ विक्रीस असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत आहेत. त्यामुळे अशा प्रकरणांवर अन्न व औषध प्रशासनाने नियमित तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

राज्यात अन्नभेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली आहे. यापूर्वीही राज्यातील विविध भागांत भेसळयुक्त अन्नपदार्थ, प्रतिबंधित गुटखा तसेच अस्वच्छ पद्धतीने तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील या प्रकाराबाबत FDA काय कारवाई करते, हे पाहणे महत्वाचे ठरेल. (Ahilyanagar Chikki)

हेही वाचा: Plane Crash : हसत-खेळत सहलीला निघाले खरे, पण तोच प्रवास ठरला अखेरचा; विमान दुर्घटनेत १३ जणांवर काळाचा घाला

FDA ने याआधीच ग्राहकांना, कोणताही संशयास्पद किंवा निकृष्ट दर्जाचा खाद्यपदार्थ आढळल्यास तातडीने त्याविषयी तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. (Ahilyanagar Chikki)

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.