
Nirmal Purja Death : जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि ‘निम्सदाई’ म्हणून ओळखले जाणारे निर्मल पुर्जा (43) यांचा पाकिस्तानातील ब्रॉड पीक (Broad Peak) पर्वतावर हिमस्खलनात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मोहिमेचे आयोजन करणाऱ्या Elite Exped या कंपनीने त्यांच्या निधनाला अधिकृत दुजोरा दिला आहे. हिमस्खलनानंतर दोन दिवस सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली.
मृत्यूमागे नेमके कारण काय?
31 जुलैपूर्वीच्या मोहिमेदरम्यान, पाकिस्तानातील गिलगिट-बाल्टिस्तान भागातील 8,051 मीटर उंच ब्रॉड पीक पर्वतावर चढाई सुरू असताना अचानक मोठे हिमस्खलन झाले. या दुर्घटनेत विविध देशांतील गिर्यारोहकांचा गट बर्फाखाली गाडला गेला. निर्मल पुर्जा यांच्यासह एकूण 10 गिर्यारोहकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. (Nirmal Purja Death)
अधिकृत माहितीनुसार, निर्मल पुर्जा यांचा मृत्यू ब्रॉड पीकवरील भीषण हिमस्खलनामुळे झाला. हिमस्खलनाचा वेग इतका प्रचंड होता की संपूर्ण गिर्यारोहक पथक बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकले. प्रतिकूल हवामान, अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थिती आणि उंचीमुळे तातडीची बचावमोहीम राबविणे शक्य झाले नाही. ड्रोनच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेण्यात आला, मात्र त्यांची सुटका करण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
कोण होते निर्मल पुर्जा?
नेपाळमध्ये जन्मलेले आणि ब्रिटिश नागरिकत्व असलेले निर्मल पुर्जा हे जगातील सर्वात धाडसी गिर्यारोहकांपैकी एक मानले जात होते. 2019 मध्ये त्यांनी जगातील 8,000 मीटरपेक्षा उंच असलेली सर्व 14 शिखरे अवघ्या सहा महिने सहा दिवसांत सर करून जागतिक विक्रम केला होता. त्यांच्या या पराक्रमावर आधारित ’14 Peaks: Nothing Is Impossible’ हा नेटफ्लिक्सवरील माहितीपट जगभर गाजला होता. (Nirmal Purja Death)
निर्मल पुर्जा यांच्या निधनानंतर जगभरातील गिर्यारोहण क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. नेपाळसह अनेक देशांच्या नेत्यांनी आणि नामवंत गिर्यारोहकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. धाडस, चिकाटी आणि अशक्य वाटणारे पराक्रम शक्य करून दाखवणारा गिर्यारोहक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनामुळे जागतिक गिर्यारोहण क्षेत्राने एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
‘अखिल महाराष्ट्र गिरियारोहण महासंघा’कडून आदरांजली
“ही अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी शोकांतिका आहे. या एकाच दुर्घटनेत गिरियारोहण क्षेत्राने १० शूर गिर्यारोहक गमावले आहेत,” अशी प्रतिक्रिया अखिल महाराष्ट्र गिरियारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी दिली. (Nirmal Purja Death)
“काराकोरम हिमालयातील आठ हजार मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या ब्रॉड पीक (Broad Peak) शिखरावर आलेल्या मोठ्या हिमस्खलनात नेपाळचे जगप्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांच्यासह अन्य नऊ गिर्यारोहकांचे दुर्दैवी निधन झाले आहे. या बातमीने जगभरातील गिरियारोहण क्षेत्रात तीव्र दुःखाची लाट पसरली आहे,” असे उमेश झिरपे म्हणाले. (Nirmal Purja Death)
ते पुढे म्हणाले, “अखिल महाराष्ट्र गिरियारोहण महासंघ आणि संपूर्ण गिरियारोहक परिवाराच्या वतीने मी सर्व दिवंगत गिर्यारोहकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या असीम दुःखाच्या प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत. ईश्वर या दुःखातून सावरण्याचे बळ त्यांच्या कुटुंबियांना देवो, हीच प्रार्थना.” (Nirmal Purja Death)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community

