-
प्रतिनिधी
Pravin Darekar : मुंबईत सध्या गणेशोत्सवाचा मोठा उत्साह सुरू असून भाविक आणि वाहनांची रस्त्यांवर अफाट गर्दी पाहायला मिळत आहे. सणाच्या या धामधुमीत विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी राजकीय नेते, आमदार आणि मंत्र्यांची शहरात सतत लगबग सुरू असते. त्यामुळे द्रुतगती मार्ग तसेच महामार्गांवर सुरक्षा ताफ्यांची वेगवान वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गर्दी आणि वाहनांचा वाढता भार यामुळे अशा मार्गांवर अचानक निर्माण होणाऱ्या परिस्थितीमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत असतो.
(हेही वाचा – Thane : ठाणेकरांचा रोजचा त्रास संपणार? रेल्वे स्थानकात पहिल्या Prepaid Rickshaw सेवेचा शुभारंभ )
काही दिवसांपूर्वीच विलेपार्ले परिसरात आमदार सुनील प्रभू यांच्या वाहनाने एका पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना ताजी असतानाच, आता ईस्टर्न फ्रीवेवर घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगामुळे एकच धावपळ उडाली. मार्गावरून जात असलेल्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांची समोरासमोर अनपेक्षित स्थिती निर्माण झाली आणि काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली आणि त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
मुंबईतील फ्रीवेवरून जात असताना भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील कार आणि एका टॅक्सीची अचानक धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने अपघाताची तीव्रता कमी असल्याने मोठा अनर्थ टळला असून दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. या घटनेनंतर स्वतः प्रवीण दरेकर गाडीतून खाली उतरून परिस्थितीची पाहणी करताना दिसले. दरेकर आणि त्यांचे सुरक्षा रक्षक पूर्णपणे सुखरूप असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

