US Iran Conflict : इराणमध्ये न जाण्यासाठी अमेरिकेचा नागरिकांना इशारा; ताबडतोब देश सोडण्याचे निर्देश

US Iran Conflict : वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. 

21
US Iran Conflict : इराणमध्ये न जाण्यासाठी अमेरिकेचा नागरिकांना इशारा; ताबडतोब देश सोडण्याचे निर्देश
  • ऋजुता लुकतुके

US Iran Conflict                इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी प्रवास न करण्याचा इशारा पुन्हा जारी केला आहे. इराणमध्ये कोणत्याही कारणासाठी प्रवास करू नका आणि सध्या इराणमध्ये असलेल्या अमेरिकी नागरिकांनी तातडीने देश सोडण्याचा प्रयत्न करावा, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे. इराणसाठी अमेरिकेची प्रवास सूचना सर्वोच्च ‘लेव्हल ४ – डू नॉट ट्रॅव्हल’ या श्रेणीत आहे. (US Iran Conflict)

अमेरिकेने आपल्या नव्या सुरक्षा इशाऱ्यात इराणमधील परिस्थिती झपाट्याने बदलू शकते, असा इशारा दिला आहे. संभाव्य संघर्षवाढीमुळे विमानसेवा रद्द होणे, हवाई क्षेत्र बंद होणे किंवा प्रवासाचे मार्ग अचानक बदलणे यांसारख्या परिस्थिती निर्माण होऊ शकतात. त्यामुळे इराणमध्ये असलेल्या अमेरिकी नागरिकांनी स्थानिक परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि उपलब्ध सुरक्षित मार्गाने बाहेर पडण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (US Iran Conflict)

(हेही वाचा – Trump-Zelenskyy भेटीत काय होणार? रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार का?)

अमेरिकी परराष्ट्र विभागाच्या प्रवास सूचनेनुसार इराणमध्ये दहशतवाद, सामाजिक अस्थिरता, अपहरण, मनमानी अटक आणि अमेरिकी नागरिकांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्याचा धोका आहे. इराणमध्ये अमेरिकेचा दूतावासही नाही. त्यामुळे आपत्कालीन किंवा नियमित राजनैतिक मदत देण्याची अमेरिकन सरकारची क्षमता अत्यंत मर्यादित आहे. स्वित्झर्लंडच्या माध्यमातून काही अमेरिकी नागरिकांना वाणिज्यदूत सेवा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे. (US Iran Conflict)

हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा तणाव कायम आहे. दुसरीकडे, येमेनमधील हौथी बंडखोरांकडून सौदी अरेबियावर झालेल्या हल्ल्यांनंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. अमेरिकेने संपूर्ण मध्यपूर्वेबाबतही आपल्या नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. (US Iran Conflict)

(हेही वाचा – ड्रायव्हिंग लायसन्सवरील जुना पत्ता बदलायचाय? RTO च्या फेऱ्या मारण्याची गरज नाही; फोनमधून असं करा अपडेट)

दरम्यान, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे या संघर्षाचा परिणाम केवळ सुरक्षेपुरता मर्यादित न राहता जागतिक ऊर्जा वाहतूक आणि तेलाच्या बाजारावरही होत आहे. अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेचा ताजा प्रवास इशारा हा मध्यपूर्वेतील वाढत्या अस्थिरतेचे आणखी एक संकेत मानला जात आहे. (US Iran Conflict)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.