केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांचा कोल्हापूर दौरा एकाकी रद्द; नेमकं कारण आलं समोर…

KLE सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या उद्घाटनासाठी अमित शाह उपस्थित राहणार होते

15
Amit Shah Kolhapur visit
अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द (फाईल फोटो)

Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दोन दिवसीय कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे. हुबळी येथील दौरा आटोपल्यानंतर अमित शाह कोल्हापूरला येणार होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांनी हुबळीहून थेट दिल्लीला रवाना होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापूरमधील नियोजित कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे.

हुबळी येथे KLE सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या उद्घाटनासाठी अमित शाह उपस्थित राहणार होते. शुक्रवारी डेनिसन्स हॉटेलमध्ये मुक्काम केल्यानंतर शनिवारी सकाळी ते उद्घाटन समारंभाला जाणार होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांनी हॉटेलमध्येच विश्रांती घेतली. (Amit Shah Kolhapur Visit)

हेही वाचा: Maratha Reservation hearing : मराठा आरक्षणाच्या सुनावणीला ‘या’ तारखेपासून पुन्हा सुरुवात होणार; सुनावणीत नेमके काय बदलणार?

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, खासदार बसवराज बोम्मई तसेच माजी मंत्री मुरुगेश निराणी, सी. सी. पाटील, इराण्णा कडाडी, अभय पाटील आणि रमेश कट्टी यांनी उद्घाटन समारंभाला जाण्यापूर्वी हॉटेलवर जाऊन अमित शाह यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

दरम्यान, अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील ₹600 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प. प्रकाश आवाडे यांच्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर या प्रकल्पाची पायाभरणी होणार होती. शून्य कचरा संकल्पनेवर आधारित साखरेवर प्रक्रिया करणारा हा देशातील पहिला बहुराज्य सहकार तत्त्वावरील प्रकल्प असल्याचे सांगण्यात आले आहे. (Amit Shah Kolhapur Visit)

हेही वाचा: डिजिटल व्यवहारांच्या युगात ग्राहकांना मोठा धक्का; बाजारातून QR कोड अचानक का होऊ लागले गायब?

या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे ₹600 कोटी आहे. केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांनी जून महिन्यात इचलकरंजी येथील कार्यक्रमात या प्रकल्पाची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी प्रकल्पासाठी जागेचा शोध घेण्यासाठी विशेष पथक पाठवले होते. या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातील विविध साखर कारखान्यांच्या जागांची पाहणी केली. तांत्रिक पाहणीनंतर जवाहर कारखान्याची जागा निश्चित करण्यात आली.

हेही पाहा:

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.