MPSC Exam Postponed: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

14
MPSC Exam: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!
MPSC Exam: राज्यसेवा २०२५च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

MPSC Exam Postponed: देशातील सर्वात मोठी परीक्षा यंत्रणा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आगामी शैक्षणिक सत्रासाठी आपल्या प्रमुख प्रवेश आणि पात्रता परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या वेळापत्रकात डिसेंबर २०२६ ते मार्च २०२७ दरम्यान होणाऱ्या JEE Main, UGC-NET, CSIR-UGC NET, CMAT आणि CUET-PG यांसारख्या प्रमुख परीक्षांच्या प्रस्तावित तारखांचा संपूर्ण तपशील दिला आहे. एनटीएने स्पष्ट केले आहे की या तारखा तात्पुरत्या असून प्रशासकीय किंवा तांत्रिक कारणांमुळे त्या बदलू शकतात.

प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर फेरतपासणी होईपर्यंत राज्यसेवा २०२५च्या मुलाखती स्थगित ठेवण्यात याव्यात, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, आयोगाकडून अधिकृत परिपत्रक जारी होण्यास विलंब झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

हेही वाचा  – Pune Crime : पुण्यातील हॉटेलमध्ये देहविक्रीचे रॅकेट उघड; पोलिसांनी सापळा रचत केला पर्दाफाश

मुलाखतींची तयारी करायची, की आगामी मुख्य परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे, असा प्रश्न उमेदवारांसमोर निर्माण झाला होता. आता मुलाखती पुढे ढकलण्यात आल्याने या संभ्रमाला काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला आहे.

अद्याप अनिश्चितता कायम…
राज्यसेवा २०२५ च्या मुलाखतींचा मुद्दा स्पष्ट झाला असला, तरी ३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान नियोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ बाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे. प्रश्नपत्रिका साधारणपणे परीक्षेच्या काही महिने आधी तयार केल्या जातात. आयोगाचे निलंबित अपर सचिव अभिजित लेंडवे यांच्या कार्यकाळात आगामी मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका तयार झाल्या असण्याची शक्यता असल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेचीही चौकशी करून, गैरप्रकाराची शक्यता असल्यास परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.

नवीन प्रश्नपत्रिका तयार करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ पुन्हा नियोजित करावी, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता आयोग या मागणीबाबत काय निर्णय घेतो, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

हेही पाहा – 
https://www.youtube.com/watch?v=A4n2mt6WPcg
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.