UPI MDR Framework : युपीआय एमडीआरचा नेटफ्लिक्स, एसआयपी, ईएमआयवर काय परिणाम होणार? जाणून घ्या नवीन नियम

UPI MDR Framework : युपीआय ऑटोप्लेसाठी सरकारचे वेगळे नियम आहेत. 

17
UPI MDR Framework : युपीआय एमडीआरचा नेटफ्लिक्स, एसआयपी, ईएमआयवर काय परिणाम होणार? जाणून घ्या नवीन नियम
  • ऋजुता लुकतुके

UPI MDR Framework               युपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात एमडीआर लागू करण्याच्या नव्या निर्णयानंतर ग्राहकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेषतः नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉन प्राईम सारख्या ओटीटी सदस्यता, म्युच्युअल फंडातील एसआयपी, विम्याचा हप्ता किंवा ईएमआय यांसाठी युपीआय ऑटोप्ले वापरणाऱ्यांना आता अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार का, असा प्रश्न आहे. मात्र, या नियमित स्वयंचलित व्यवहारांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे युपीआय ऑटोप्ले व्यवहारांवर निर्धारित एमडीआर आकारला जाणार नाही. नव्या व्यवस्थेनुसार १५ ऑक्टोबर २०२६पासून २,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र व्यक्ती-ते-व्यापारी युपीआय व्यवहारांवर सामान्यतः ०.४ टक्के एमडीआर लागू होईल. मात्र हे शुल्क ग्राहकांकडून थेट वसूल करण्यासाठी नाही. तसेच व्यक्ती-ते-व्यक्ती व्यवहार शुल्कमुक्त राहतील. (UPI MDR Framework)

(हेही वाचा – अरबी समुद्रात Pakistanच्या युद्धनौकेची भारतीय युद्धनौकेला धडक; परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकच्या उच्चायुक्तांना समन्स )

मात्र युपीआय ऑटोप्ले ही वेगळी व्यवस्था आहे. ग्राहक एखाद्या सेवेसाठी एकदा परवानगी देतो आणि त्यानंतर ठरलेल्या तारखेला संबंधित रक्कम त्याच्या खात्यातून आपोआप वजा होते. ओटीटी सदस्यता, वीज आणि मोबाइल बिले, विमा हप्ते, ईएमआय आणि म्युच्युअल फंड एसआयपी यांसारख्या नियमित देयकांसाठी या सुविधेचा वापर करता येतो. नव्या एमडीआर चौकटीत अशा स्वयंचलित आवर्ती व्यवहारांना निर्धारित एमडीआर मधून वगळण्यात आले आहे. म्युच्युअल फंड आणि भांडवली बाजारातील सामान्य युपीआय व्यवहारांसाठी मात्र स्वतंत्र एमडीआर रचना आहे. अशा व्यवहारांसाठी एमडीआर ०.०२ टक्के, कमाल ३०० रुपये प्रतिव्यवहार अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र हा नियम ऑटोप्लेच्या माध्यमातून होणाऱ्या आवर्ती व्यवहारांपेक्षा वेगळा आहे. (UPI MDR Framework)

(हेही वाचा – Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात वीर सावरकर विचारांचा जागर, ‘जेन झी’च्या संकल्पनेतून साकारला जीवनपट)

ग्राहकांसाठी याचा साधा अर्थ असा-तुमच्या खात्यातून दर महिन्याला नेटफ्लिक्सचे शुल्क, एसआयपीची रक्कम किंवा एखादा विमा हप्ता युपीआय ऑटोप्लेद्वारे आपोआप जात असेल, तर केवळ नव्या एमडीआर नियमामुळे त्या व्यवहारावर स्वतंत्र युपीआय शुल्क लागणार नाही. मात्र ऑटोप्लेमध्ये कोणते व्यवहार सक्रिय आहेत, त्यांची रक्कम आणि वारंवारता वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे आहे. युपीआच्या नव्या शुल्करचनेचा मुख्य परिणाम त्यामुळे मोठ्या व्यापारी व्यवहारांवर होणार आहे; ग्राहकांच्या नियमित ऑटोप्ले व्यवस्थेवर नाही. युपीआयच्या पायाभूत सुविधा, सायबर सुरक्षा आणि डिजिटल पेमेंट व्यवस्थेचा खर्च भागवण्यासाठी ही नवी महसूलरचना आणण्यात आली आहे. (UPI MDR Framework)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.