(हेही वाचा Disha Salian मृत्यू प्रकरणात CBIचा अखेर FIR; संशयितांची यादी मोठी, पण आरोपींच्या कॉलममध्ये एकही नाव नाही!)
प्रकृती अस्वास्थ्यामुळेच त्यांनी आपला भारत दौरा नियोजित वेळेपूर्वीच आटोपता घेतला, असा दावा वानजुन यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जिनपिंग (Xi Jinping) यांची द्विपक्षीय चर्चा पार पडली असली, तरी मोदींनी आयोजित केलेल्या विशेष ‘गाला डिनर’ला जिनपिंग गैरहजर राहिले होते. त्यावेळी त्यांच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते. सुमारे सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा पहिलाच भारत दौरा होता; यापूर्वी ते ऑक्टोबर २०१९ मध्ये महाबलीपुरम शिखर परिषदेसाठी आले होते.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर चीन सरकार, संबंधित रुग्णालय किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय अधिकृत संस्थेने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे या दाव्यांची सत्यता अद्याप अस्पष्ट असली, तरी जागतिक राजकारणात आणि सोशल मीडियावर यावरून जोरदार चर्चा रंगली आहे. (Xi Jinping)


