-
कल्याण, प्रतिनिधी
Dombivli डोंबिवली येथील मध्य रेल्वेच्या तिकीट तपासणी विभागातील कर्मचारी आणि मुख्य तिकीट तपासणीस वृषाली सावंत-जाधव यांनी प्रसंगावधान व कर्तव्यदक्षतेचे उत्तम उदाहरण सादर करत एका जखमी प्रवाशाला वाचविले आहेत. वृषाली यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या संदर्भात हकीकत अशी की, बुधवारी सकाळी डोंबिवली स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वर कर्तव्यावर असताना तिकीट तपासणीस वृषाली सावंत-जाधव यांच्या निदर्शनास आले की पूजा नावाची २३ वर्षे वयाची एक तरूणी ट्रेनमधून उतरताना प्लॅटफॉर्मवर पडली. (Dombivli)
(हेही वाचा – Jharkhand विद्यार्थी आंदोलनावर राहुल गांधी गप्प का? “तिथल्या तरुणांना काहीच किंमत नाही का?”; भाजपचा हल्लाबोल)
गर्दीमुळे ट्रेनमधून उतरणाऱ्या इतर प्रवाशांचीही तिच्यावर धडक झाली. ती प्रवासी जखमी झाली होती आणि स्वतःहून उभी राहू शकत नव्हती. वृषाली जाधव यांनी त्वरित तिच्या मदतीसाठी धाव घेतली. मदतीसाठी परवानाधारक हमालाची व्यवस्था करण्याकरिता त्यांनी स्थानकावरील उद्घोषकास सांगितले. मात्र जखमी प्रवाशाला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे ओळखून त्यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले. मानवता आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शन घडवत तपासणीस जाधव यांनी परवानाधारक हमालाची वाट न पाहता, त्या जखमी प्रवाशाला स्वतःच्या हातांत उचलले आणि स्टेशन व्यवस्थापकांच्या कार्यालयाच्या दिशेने धाव घेतली. (Dombivli)
(हेही वाचा – Strait of Hormuz मधून ६० व्यापारी जहाजे भारतात पोहोचली; ३९७२ खलाशी सुरक्षितपणे परतले)
त्यानंतर जखमी तरूणीला पुढील वैद्यकीय उपचारांसाठी त्वरित जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. मध्य रेल्वे स्थानकात वृषाली सावंत-जाधव यांच्या या तत्पर आणि संवेदनशील कृतीचे कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या वेळेवर केलेल्या मदतीमुळेच त्या जखमी तरूणीला तत्काळ वैद्यकीय उपचार मिळू शकले. मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन करते की, ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना काळजी घ्यावी. आधी उतरणाऱ्या प्रवाशांना खाली उतरू द्यावे. मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेप्रती आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित करते आणि अशा आघाडीवरील कर्मचाऱ्यांच्या सेवेची दखल घेते, जे गरजू प्रवाशांना मदत करण्यासाठी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन कार्य करतात. (Dombivli)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

