अखिल भारतीय संत समिती धर्म समाज यांच्या वतीने शनिवार, ८ ऑगस्ट २०२६ या दिवशी सकाळी १०:३० वाजता ट्री लँड सोसायटीमध्ये मेपल हॉल, गंगापूर रोड, सोमेश्वर, नाशिक (Nashik) येथे एक महत्त्वपूर्ण धार्मिक समारोह व संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस देशभरातील विविध आखाडे, मठ, पीठे, धार्मिक संस्था तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभणार आहेत. (Nashik)
या बैठकीला (Nashik) संयुक्त राष्ट्रीय महामंत्री तथा मध्यप्रदेशचे राज्यमंत्री, महामंडलेश्वर मनमोहन दास (राधे राधे बाबा) महाराज, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, राष्ट्रीय अध्यक्ष, आचार्य सुभेश शर्मन, त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अध्यक्ष आखाडा परिषद, महंत महामंडलेश्वर स्वामी शंकरानंद महाराज (भगवान बाबा), आनंद आखाडा, नाशिक कुंभमेळा आखाडा परिषद प्रवक्ता, महंत भक्तीचरणदास महाराज, तंत्रकौलाचार्य महापंडित मयुरेशशास्त्री दीक्षित, अध्यात्मिक आघाडी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, भाजपा आचार्य तुषारजी भोसले, त्र्यंबकेश्वर तीर्थ पुरोहित पंडित संकेत टोके गुरुजी आदी मान्यवर या बिथाकीत उपस्थित राहणार आहेत.
(हेही वाचा राज्यातील मतदारांना मोठा दिलासा! SIR प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ; कधीपर्यंत फॉर्म भरता येणार?)
(Nashik) याशिवाय चारही वेदांचे वेदाचार्य, विविध धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी, संत, महंत, धर्माचार्य, पुरोहित, विद्वान तसेच अनेक सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये धर्म, संस्कृती, राष्ट्रहित, संत समाजाचे संघटन, आगामी कुंभमेळा धार्मिक उपक्रम तसेच विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. (Nashik)
Join Our WhatsApp Community


