कल्याण-डोंबिवलीत लोकशाहीर Annabhau Sathe Jayanti उत्साहात साजरी; शोषितांच्या आवाजाला केडीएमसीचा सलाम

कल्याण-डोंबिवलीत लोकशाहीर Annabhau Sathe Jayanti उत्साहात साजरी; शोषितांच्या आवाजाला केडीएमसीचा सलाम

79
कल्याण-डोंबिवलीत लोकशाहीर Annabhau Sathe Jayanti उत्साहात साजरी; शोषितांच्या आवाजाला केडीएमसीचा सलाम
कल्याण-डोंबिवलीत लोकशाहीर Annabhau Sathe Jayanti उत्साहात साजरी; शोषितांच्या आवाजाला केडीएमसीचा सलाम
कल्याण : प्रतिनिधी

साहित्य, संगीत आणि संघर्ष यांचा त्रिवेणी संगम असलेले, वंचित-शोषितांच्या व्यथा आपल्या लेखणी आणि पोवाड्यातून जगासमोर मांडणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त(Annabhau Sathe Jayanti)कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसह संस्था/संघटनांच्यावतीने शनिवारी विविध ठिकाणी आदरांजली वाहण्यात आली.

महापालिका मुख्यालयात सकाळी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात कडोंमपा महापौर ॲड. हर्षाली चौधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर ॲड. हर्षाली चौधरी म्हणाल्या, अण्णाभाऊंचे जीवन म्हणजेच एक चलवळ होती. फकिरा, वाघ्या, चित्रा, यांसारख्या कादंबऱ्यांतून आणि माझी मैना गावाकड राहिली…या सारख्या गीतांतून त्यांनी समाजाला समतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. त्यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आणि मार्गदर्शक आहेत. आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून केवळ कथा सांगितल्या नाहीत, तर समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली. प्रशासन म्हणून आम्हीही त्यांच्या विचारांमधून माणुसकी आणि संवेदनशीलता शिकली पाहिजे.(Annabhau Sathe Jayanti)

(हेही वाचा – Ahilyanagar Chikki : चिक्कीचे पॅकेट उघडताच बसला धक्का; हातावर आल्या जिवंत अळ्या, FDA काय कारवाई करणार? )

या अभिवादन कार्यक्रमाला महापालिका सचिव किशोर शेळके, शहर अभियंता अनिता परदेशी, उपायुक्त सुषमा मांडगे, कार्यकारी अभियंता संदीप तांबे, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, सुरक्षा अधिकारी भरत बुळे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात अण्णाभाऊंच्या जयघोषाने वातावरण भारून गेले होते.(Annabhau Sathe Jayanti)

लाल चौकीतील पुतळ्यासही पुष्पांजली

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात कल्याण पश्चिमेकडे असलेल्या लाल चौकी परिसरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्थानिक नगरसेविका विजया पोटे, उपायुक्त सुषमा मांडगे आणि सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात उपस्थित होते. पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर उपस्थितांनी अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या समता-बंधुतेच्या मार्गाने चालण्याचा संकल्प केला.(Annabhau Sathe Jayanti)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.