Bijli Tigress: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या ‘बिजली’ वाघिणीचा मृत्यू

14
Bijli Tigress: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या 'बिजली' वाघिणीचा मृत्यू
Bijli Tigress: पर्यटकांचे आकर्षण असलेल्या 'बिजली' वाघिणीचा मृत्यू

Bijli Tigress: ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील ((Sanjay Gandhi National Park) पर्यटकांचे आकर्षण ठरलेली वाघीण बिजली(टी २) वृद्धापकाळाशी संबंधित आरोग्यविषयक समस्यांमुळे तिची प्रकृती गेल्या काही काळापासून खालावत होती.तिचा बुधवारी रात्री ९.४५ वाजता मृत्यू झाला. ती १८ वर्षे ४ महिन्यांची होती.

उद्यान प्रशासनाच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापासून बिजलीच्या आहाराचे प्रमाण हळूहळू कमी झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर तिच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तांत्रिक पशुवैद्यकीय सल्लागार समितीच्या मार्गदर्शनाने तिला आवश्यक उपचार आणि सहाय्यक वैद्यकीय सेवा देण्यात आल्या. मात्र, वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नांनंतरही तिचे निधन झाले.

हेही वाचा – ‘त्या’ एका कारणामुळे Manoj Jarange यांची अचानक माघार? आंदोलनाच्या नाटकावरून पेटला राजकीय वाद

बिजलीला ११ जुलै २०१६ रोजी पेंच व्याघ्र प्रकल्पातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. त्यानंतर दहा वर्षांहून अधिक काळ ती उद्यानाच्या देखरेखीखाली होती. या काळात लाखो पर्यटकांनी तिचे दर्शन घेतले. उद्यानातील पशुवैद्यकीय आणि देखभाल पथकासाठीही ती विशेष जिव्हाळ्याची होती. बिजलीच्या दीर्घ वास्तव्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यजीव व्यवस्थापन, संवर्धनविषयक जनजागृती आणि प्राण्यांच्या देखभालीच्या प्रयत्नांमध्ये तिचे महत्त्वाचे स्थान राहिले.

प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार तिचा मृत्यू वृद्धापकाळामुळे झाला असला, तरी मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी नियमानुसार शवविच्छेदन करण्यात येणार आहे. दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने बिजलीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत तिच्या वन्यजीव संवर्धनातील योगदानाला आदरांजली वाहिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.