म्युल अकाऊंट्सद्वारे Cyber ​​Fraud; मास्टरमाइंडसह ७ जण मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

78
Digital Arrest च्या जाळ्यात दक्षिण मुंबईतील ज्येष्ठ महिला; क्रिप्टोकरन्सीद्वारे तब्बल सव्वासात कोटींची लूट
Digital Arrest च्या जाळ्यात दक्षिण मुंबईतील ज्येष्ठ महिला; क्रिप्टोकरन्सीद्वारे तब्बल सव्वासात कोटींची लूट
  • प्रतिनिधी 

देशभरात सायबर फसवणुकीची रक्कम ‘म्युल अकाऊंट्स’ (Mule Accounts) द्वारे लपवून ती ठिकाण्यावर पोहोचवणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा मुंबई पोलिसांच्या मध्य प्रादेशिक सायबर टीमने पर्दाफाश केला आहे. बोरीवली येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखेतून रंगेहात पैसे काढताना मुख्य सूत्रधार सलमान हबीब पठानसह सात जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस कारवाईदरम्यान आरोपींकडून १० लाख रुपयांची रोकड ३० हून अधिक बनावट कंपन्यांचे रबर स्टॅम्प, नोट मोजण्याचे मशिन्स, बँक खाते उघडणारे डिजिटल टॅब, डझनभर चेकबुक्स, स्मार्टफोन्स आणि सक्रिय सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुख्य आरोपी सलमान हबीब पठान याने आपल्या साथीदारांसोबत एक संघटित गिरोह तयार केला होता. या गिरोहने इंडियन ओव्हरसीज बँकेच्या दादर, माहिम, बोरीवली आणि मीरा रोड-भायंदर शाखांमध्ये गणेश टेक्स्टाईल, कुशल एंटरप्राइजेज, रिचा एंटरप्राइजेज आणि केजीएन एंटरप्राइजेज यांसारख्या डझनभर बोगस कंपन्यांच्या नावाने ‘करंट अकाउंट’ उघडले होते. राष्ट्रीय सायबर अपराध रिपोर्टिंग पोर्टलवर (NCRP) तपासणी केली असता, देशभरातील सायबर फसवणुकीची रक्कम याच खात्यांमध्ये वळती केली जात असल्याचे उघड झाले.

(हेही वाचा – Saffron Jersey Row : हॉकी संघाच्या भगव्या जर्सीमुळे झालेला वाद चिघळला, हॉकी इंडियाने उचलली पावलं)

२९ जुलै रोजी आरोपी बोरीवलीतील इंडियन ओव्हरसीज बँकेतून बनावट चेकद्वारे प्रत्येकी १० लाख रुपयांची रोकड काढण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सायबर पोलिसांच्या पथकाने बँकेच्या परिसरात सापळा रचला. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जसे आरोपी रोख रक्कम घेऊन बाहेर पडले, तसे पोलिसांनी मुख्य आरोपी सलमान हबीब पठान (३४), साजिद निसार अहमद कोठावाला (४५) आणि चिराग केतन टोपराणी (३१) यांना रंगेहात जेरबंद केले. मुख्य आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांच्या पथकांनी भायंदर आणि मीरा रोड येथील त्यांच्या कार्यालयांवर ताबडतोब छापे टाकले. या कारवाईदरम्यान त्यांच्या इतर चार साथीदारांना-सैयद वजाहत वाहीउद्दीन, राकेश रमाशंकर मिश्रा, रक्षित के. राजेंद्र हेगड़े आणि आर्यन रितेश ठक्कर यांनाही ताब्यात घेण्यात आले.

वरळी सायबर पोलीस ठाण्याचे अधिकारी अभिजीत गोंजारी यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपींविरोधात फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि आपापसात संगनमत करून कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गिरोहने आतापर्यंत नेमकी किती कोटी रुपयांची रक्कम लाटली आहे आणि यात बँकेतील काही अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का? याचा सखोल तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.