Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची धडक कारवाई; डेअरीमध्ये जे सापडले ते पाहून अधिकारीही चक्रावले

कारवाईत 3 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून, डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे

188
Chhatrapati Sambhajinagar FDA Raid
छत्रपती संभाजीनगरमधील डेरीवर एफडीएची धडक कारवाई (प्रातिनिधिक फोटो)

Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : राज्यभर अन्नभेसळविरोधी मोहीम सुरू असताना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत, अमोल डेअरीमध्ये अपायकारक गैर-खाद्य सोयाबीन तेलाचा वापर करून तूप आणि पनीर तयार केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत 3 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करून आस्थापने बंद करण्यात आली आहेत.

950 किलो बनावट उत्पादन जप्त

FDA च्या तपासादरम्यान डेअरीतून सुमारे 950 किलो बनावट दुग्धजन्य उत्पादन जप्त करण्यात आले. यामध्ये 299 किलो सुट्टे तूप (किंमत 1,67,440 रुपये), 199 किलो सुट्टी साय (क्रीम) (किंमत 55,720 रुपये), 174 किलो पनीरचे 35 ब्लॉक्स (किंमत 45,240 रुपये) आणि 278 किलो रिफाइंड सोयाबीन तेल (किंमत 44,480 रुपये) यांचा समावेश आहे. याशिवाय तपासादरम्यान 10 ते 12 बॅरल गैर-खाद्य सोयाबीन तेलाचाही साठा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला. या संपूर्ण जप्त मालाची किंमत 3 लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. याच तेलाचा वापर करून बनावट गाईचे तूप, क्रीम आणि पनीर तयार केले जात असल्याचे एफडीएच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. (Chhatrapati Sambhajinagar FDA Raid)

हेही वाचा: Vande Bharat Heart Transplant : वंदे भारतमधून प्रथमच मानवी ह्रदयाची वाहतूक, सुरत ते अहमदाबाद काही तासांतच, रुग्णाला मिळाले नवीन जीवन

परवाना निलंबित; आस्थापने बंद

अमोल डेअरीवरील धाडीनंतर FDA ने संबंधित ‘लक्ष्मी डेअरी’च्या तीन रिटेल दुकानांवरही तपासणी मोहीम राबवली. तपासादरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्यानंतर संबंधित उत्पादनांची तपासणी करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून दोषींविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. (Chhatrapati Sambhajinagar FDA Raid)

अन्नसुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित डेअरी युनिटचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला. त्याचबरोबर उत्पादन केंद्र बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. FDA ने अन्नभेसळ किंवा ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या प्रकरणांमध्ये कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. (Chhatrapati Sambhajinagar FDA Raid)

हेही पाहा: 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.