Pralhad Joshi Education Minister: नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यापुढील प्राधान्यक्रम, आव्हाने काय? परीक्षा सुधारणाविषयक तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…

101
Pralhad Joshi Education Minister: नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यापुढील प्राधान्यक्रम, आव्हाने काय? परीक्षा सुधारणाविषयक तज्ज्ञांचे मत जाणून घ्या...
Pralhad Joshi Education Minister: नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यापुढील प्राधान्यक्रम, आव्हाने काय? परीक्षा सुधारणाविषयक तज्ज्ञांचे मत जाणून घ्या...

 Pralhad Joshi Education Minister: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. यानंतर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे त्यांच्या विद्यमान मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे आता ते ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयासोबतच शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळणार आहेत. नवीन शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण, प्राधान्यक्रम, परीक्षा सुधारणा आणि विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच्या आव्हानांचे विश्लेषण पाहूया –

प्रल्हाद जोशी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९६२ रोजी कर्नाटकातील विजयपुरा येथे झाला. त्यांचे वडील स्वर्गीय व्यंकटेश जोशी हे भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी होते, तर त्यांच्या आईचे नाव मालतीबाई होते. सामान्य कुटुंबात वाढलेल्या प्रल्हाद जोशी यांना विद्यार्थी जीवनापासूनच सामाजिक कार्य आणि जनतेच्या हिताच्या मुद्द्यांमध्ये रस होता.पुढे त्यांनी सामाजिक उपक्रमांसोबतच एक व्यवसाय उभारला आणि त्यानंतर सक्रीय राजकारणात प्रवेश केला.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar च्या राजकारणात खळबळ! तब्बल २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; पुढे काय होणार?

प्रल्हाद जोशी किती शिकलेले आहेत?
प्रल्हाद जोशी यांनी आपले प्राथमिक शिक्षण रेल्वे स्कूलमधून घेतले. त्यानंतर त्यांनी हुबळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांनी कर्नाटक विद्यापीठ, धारवाड यांच्याशी संलग्न असलेल्या के.एस. आर्ट्स कॉलेज, हुबळी येथे प्रवेश घेतला आणि बॅचलर ऑफ आर्ट्स ही पदवी मिळवली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात अधिक सक्रिय झाले.

संसदीय अनुभव
प्रल्हाद जोशी यांनी केंद्रात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. संसदीय अनुभव आणि संकट व्यवस्थापन हाताळण्याच्या कौशल्य बळावर २०१९ ते २०२४ पर्यंत जोशी यांनी संसदीय कार्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला होता. नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. संसदेत सरकारची रणनिती आखणे, विरोधकांशी समन्वय साधणे आणि कठीण परिस्थिती हाताळण्यात त्यांची हातोटी आहे. सध्या ते ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयही सांभाळत आहेत. आता प्रथमच प्रल्हाद जोशी भारताच्या शिक्षण व्यवस्थेची धुरा सांभाळणार आहेत. ३० मे २०१९ रोजी त्यांनी पहिल्यांदा केंद्रिय मंत्री म्हणून शपथ घेतली होती.त्यावेळी त्यांच्याकडे संसदीय कार्य, कोळसा आणि खाणं मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. आता त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

जोशी यांच्यासमोरील आव्हाने
विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करणे, हे प्रल्हाद जोशी यांच्या समोरील सर्वात मोठे आणि कठीण आव्हान असणार आहे. NEET-UG मधील पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. तो पुन्हा मिळवणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. प्रथमच प्रल्हाद जोशी भारताच्या शिक्षण व्यवस्थेची धुरा सांभाळणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांसाठी आवश्यक सुधारणा किती प्रभावीपणे राबवल्या जातात, यावर त्यांच्या कार्यकाळाचे यश अवलंबून असेल. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे या परीक्षा घेणाऱ्या एनटीए वर कुणाचाच विश्वास राहिलेला नाही. पारदर्शक परीक्षा होण्यासाठी NTAमध्ये आमूलाग्र बदल घडवण्याचे शिवधनुष्य प्रल्हाद जोशी यांना पेलावे लागणार आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या कामकाजात सुधारणा करून भविष्यात पेपरफुटी रोखावी लागेल. यासाठी संगणक आधारित परीक्षा -CBT प्रणालीचा विस्तार करण्यावर भर दिला जाणार आहे.

कठोर कायदा आणावा लागेल?
परीक्षेतील गैरप्रकार रोखण्साठी आधीच प्रस्तावित असलेला कडक कायदा प्रभावीपणे राबवणे आणि शैक्षणिक संस्थांशी थेट संवाद वाढवणे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, उच्च शिक्षणातील सुधारणा, विद्यापीठांच्या मान्यता प्रक्रिया आणि कौशल्याधारित शिक्षणाला गती देणे यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये चांगला समन्वय साधण्याची तारेवरची कसरत जोशी यांना करावी लागणार आहे.

राजकीय विश्लेषक काय म्हणतात?
प्रल्हाद जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देणे म्हणजे सरकार सध्या मोठा राजकीय बदल न करता प्रशासकीय स्थिरता आणि संकट व्यवस्थापनावर भर देत आहे, असा स्पष्ट संदेश आहे. पुढील काळात जोशी शिक्षण मंत्रालयात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि राष्ट्रीय परीक्षांवरील विश्वास कसा परत आणतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.