FDA च्या कारवाईने हॉटेल मालक संघटना घाबरल्या; कारवाईनंतर नाव, फोटो जाहीर न करण्याची मागणी

हॉटेल संघटनांचे अन्न व औषध प्रशासनाला साकडेहॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया आणि इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली.

68

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील उपहारगृहे, हॉटेल्स आणि व्यावसायिकांवर सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, या कडक कारवाईविरोधात आता हॉटेल व्यावसायिक, न्यायालयीन यंत्रणा आणि खुद्द एफडीएच्या (FDA) अधिकाऱ्यांमधूनच विरोधाचा सूर उमटू लागला आहे. हॉटेल मालकांच्या प्रमुख संघटनांनी एकत्र येत अन्न व औषध प्रशासनाला कायदेशीर प्रक्रियेचे (तंतोतंत पालन करण्याचे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हॉटेल व्यावसायिकांची नावे, फोटो व व्हिडिओ जाहीर न करण्याचे आवाहन केले आहे.

(हेही वाचा दिल्ली दंगलीची ‘ती’ काळी रात्र; हत्या झालेल्या आयबी अधिकारी Ankit Sharma यांचा मारेकरी ताहीर हुसेनला जन्मठेप )

हॉटेल संघटनांचे अन्न व औषध प्रशासनाला साकडेहॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया आणि इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकाद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली. ग्राहकांचे आरोग्य आणि सुरक्षा राखण्याच्या एफडीएच्या (FDA) मोहिमेला पाठिंबा दर्शवतानाच, त्यांनी तत्त्वांचे रक्षण करण्याची मागणी केली आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ३२ अंतर्गत परवाना थेट निलंबित किंवा रद्द करण्यापूर्वी व्यवसायिकांना त्रुटी दुरुस्त करण्यासाठी ‘सुधारणा नोटीस’ देण्यात यावी. कायदेशीर प्रक्रिया आणि तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही हॉटेलचे किंवा मालकाचे नाव, फोटो व व्हिडिओ सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध करू नयेत. तपासणीतील प्राथमिक निष्कर्षांवरून लगेच जाहीर वक्तव्ये करणे टाळावे, कारण पुढील पुनर्रचनेत बऱ्याचदा नियमपालन झाल्याचे समोर येते. अनेक दशकांपासून कष्टाने उभा केलेला व्यवसाय प्राथमिक तपासणीच्या जोरावर बदनाम झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसतो आणि ग्राहकांचा विश्वास उडतो, अशी भावना संघटनांनी व्यक्त केली. (FDA)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.