एआयच्या मदतीने पियुष गोयल यांचा Fake Video; मोदींविरोधातील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी महाराष्ट्र सायबरचा गुन्हा

61
पियुष गोयल आणि नरेंद्र मोदी यांचा बनावट व्हिडिओ संदर्भातील छायाचित्र
एआयच्या मदतीने पियुष गोयल यांचा Fake Video; मोदींविरोधातील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी महाराष्ट्र सायबरचा गुन्हा
  • प्रतिनिधी 

Fake Video          केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून कथितरीत्या तयार करण्यात आलेला बनावट आणि डिजिटली मॉर्फ केलेला व्हिडिओ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणारी आक्षेपार्ह सामग्री सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबरने अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भाजपाच्या एका सोशल मीडिया पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित सोशल मीडिया खात्यांचा तपास सुरू करण्यात आला आहे. (Fake Video)

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, २५ जुलै रोजी ‘महाराष्ट्र धर्म’ नावाच्या फेसबुक खात्यावरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल आंदोलकांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य करत असल्याचे दिसत होते. सुरुवातीला हा व्हिडिओ खरा असल्याचा भास झाला. मात्र, एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या मूळ व्हिडिओशी तुलना केल्यानंतर संबंधित क्लिपमध्ये डिजिटल फेरफार करण्यात आल्याचा किंवा ती एआयच्या मदतीने तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. (Fake Video)

(हेही वाचा – दिल्ली दंगलीची ‘ती’ काळी रात्र; हत्या झालेल्या आयबी अधिकारी Ankit Sharma यांचा मारेकरी ताहीर हुसेनला जन्मठेप )

तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील काही खात्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मॉर्फ केलेली छायाचित्रे आणि आक्षेपार्ह मजकूरही प्रसारित करण्यात आला. या पोस्टद्वारे खोटी माहिती पसरवणे, जनतेमध्ये संभ्रम आणि अशांतता निर्माण करणे तसेच घटनात्मक पदांवरील व्यक्तींची प्रतिमा मलीन करणे हा उद्देश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Fake Video)

या तक्रारीनंतर महाराष्ट्र सायबरने संबंधित फेसबुक आणि इन्स्टाग्राम खात्यांच्या लिंकची तपासणी सुरू केली आहे. कथित व्हिडिओ आणि पोस्टचा मूळ स्रोत शोधणे, संबंधित खात्यांची ओळख पटवणे तसेच सामग्री तयार आणि प्रसारित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा वापर झाला होता का, याचा तपास केला जात आहे. तपासाचा भाग म्हणून सर्व डिजिटल पुरावे जतन करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (Fake Video)

(हेही वाचा – करदात्यांसाठी आज ITR Deadline भरण्याची शेवटची तारीख, मुदतवाढ होणार का? जाणून घ्या…)

या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ३१८(२), ३३६, ३५२, ३५३(१), ३५३(२), ३५६(१), ३५६(२) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६डी आणि ६७ अन्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कथित पोस्ट आणि व्हिडिओमागील व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून पुढील तपास महाराष्ट्र सायबरकडून करण्यात येत आहे. (Fake Video)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.