
देशासह राज्यभर गाजलेल्या बहुचर्चित टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी दानिश खान (Danish Khan) आणि निदा खान (Nida Khan) यांच्या जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी आता ६ जुलैला होणार आहे. यापूर्वी या प्रकरणात अनेकदा सुनावणीच्या तारखा पडल्या असून, अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने या प्रकरणातील सस्पेन्स आणखी वाढला आहे. (Nida Khan)
(हेही वाचा – Sheikh Hasina यांच्या परतीची घोषणा; आता आवामी लीग बांगलादेश पेटवणार?)
या संवेदनशील प्रकरणात सरकार पक्ष आणि बचाव पक्ष या दोन्ही बाजूंचा जोरदार युक्तिवाद आधीच पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता केवळ न्यायालयाचा अंतिम निर्णय येणे एवढीच प्रक्रिया बाकी आहे. मात्र, विविध तांत्रिक कारणांमुळे हा निर्णय जाहीर होऊ शकलेला नाही, परिणामी सुनावणीची तारीख वारंवार पुढे जात असल्याचे चित्र आहे.
(हेही वाचा – Mumbai Crime : मुंबईत बिष्णोई गँगची एन्ट्री? दोन पंजाबच्या गुंडांना अत्याधुनिक पिस्तूलांसह अटक)
दरम्यान मंगळवारी न्यायालयाकडून अंतिम निर्णय येणे अपेक्षित होते. मात्र, न्यायालयाने आता पुढील अंतिम सुनावणी ६ जुलैला निश्चित केली आहे. त्यामुळे संशयितांना जामीन मिळणार की त्यांचा मुक्काम जेलमध्येच राहणार, याकडे दोन्ही पक्षांसह संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता, जनतेमध्येही याविषयी प्रचंड उत्सुकता आहे. ६ जुलैला होणाऱ्या अंतिम सुनावणीत न्यायालयाच्या निर्णयाचा पुढचा अंक काय असेल, यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
