CM Devendra Fadnavis : ‘एल निनो’चे संकट रोखणार; राज्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची धडक मोहीम!

62
CM Devendra Fadnavis : 'एल निनो'चे संकट रोखणार; राज्यात कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची धडक मोहीम!
  • प्रतिनिधी

​CM Devendra Fadnavis            यंदाच्या पावसाळ्यात ‘एल निनो’मुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य टंचाईच्या सावटाकडे राज्य सरकारने संधी म्हणून पाहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश देत, या संकटाचे रूपांतर इष्टापत्तीत करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेचा मुख्य केंद्रबिंदू राज्यातील नादुरुस्त कोल्हापुरी बंधारे राहणार असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी आता एक धडक कार्यक्रम राबवला जाणार आहे. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – Ambenali Ghat Landslide : मुसळधार पावसामुळे दरड कोसळली; पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता काही तासांसाठी ठप्प )

​राज्यातील जलसंपदा आणि मृद व जलसंधारण विभागांकडे असलेल्या शेकडो बंधाऱ्यांपैकी जे बंधारे नादुरुस्त आहेत, त्यांना तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुरुस्तीच्या कामात धातूचा वापर टाळून शाश्वत पर्याय शोधण्यावर भर दिला जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास राज्यात तब्बल २ लाख ३९ हजार १८१ हेक्टर इतकी सिंचन क्षमता नव्याने निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी नवीन कामांऐवजी जुन्या कामांच्या दुरुस्तीलाच प्राधान्य दिले जाणार आहे. (CM Devendra Fadnavis)

(हेही वाचा – ​‘AI’चा धोका की वरदान? आता राज्य सरकार आखणार तंत्रज्ञानाच्या गैरवापराला लगाम!)

​यासोबतच सोलापूर, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजी नगर सारख्या जिल्ह्यांमध्ये वीज वितरणाची समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेगळे नियोजन करण्याचे सुचवले आहे. कृषी पंपांच्या वाढत्या लोडमुळे वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा टाळण्यासाठी फिडर व्यवस्था बळकट केली जाणार आहे. सौर ऊर्जेच्या उपकरणांच्या देखभालीसाठी स्थानिक पातळीवर कौशल्य विकास कार्यक्रम राबवून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. आपत्ती व्यवस्थापन विभागाला दुष्काळी भागाचा डेटा तयार करून त्यानुसार सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पाटबंधारे विकास महामंडळाला ही सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे अधिकार सोपवण्यात आले आहेत. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.